‘बाय बाय डिप्रेशन- सॉरी गुड्डी’ फेसबुक पोस्ट करत विहिरीत उडी मारुन पुण्यात शिक्षकाची आत्महत्या

फेसबुकवर 'बाय बाय डिप्रेशन' असा मेसेज लिहून पुण्यातील शिक्षकाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. सासवडजवळील भिवरी गावातील एका शेतातील विहिरीत उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. (Pune Commins College professor praful meshram Commit Suicide)

'बाय बाय डिप्रेशन- सॉरी गुड्डी' फेसबुक पोस्ट करत विहिरीत उडी मारुन पुण्यात शिक्षकाची आत्महत्या
विहिरीतला मृतदेह माकडांमुळे लोकांना कळाला
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 1:16 PM

पुणे : फेसबुकवर ‘बाय बाय डिप्रेशन’ असा मेसेज लिहून (Suicide Note) पुण्यातील शिक्षकाने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. सासवडजवळील भिवरी गावातील एका शेतातील विहिरीत उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. प्रफुल दादाजी मेश्राम Praful Meshram (वय 45) असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

पुण्यात शिक्षकाची आत्महत्या

प्रफुल्ल दादाजी मेश्राम हे कमिन्स महाविद्यालयात (Commins College Pune) नोकरी करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते. एका आजारातून ते नुकतेच बाहेर पडले होते. गेले काही दिवस ते कुणाशीही बोलत नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बाय बाय डिप्रेशन सॉरी गुड्डी फेसबुक पोस्ट

मंगळवारी दुपारच्या सुमारास ‘बाय बाय डिप्रेशन सॉरी गुड्डी’ अशी एक पोस्ट लिहून भिवरी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत उडी मारुन त्यांनी आपलं जीवन संपवलं. फेसबुकवरील पोस्ट वाचून अनेकांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत त्यांनी अखेरचं पाऊल उचललं होतं. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी, मित्रांनी शोधाशोध सुरु केली. काही तासाने एका व्यक्तीने विहिरीत आत्महत्या केल्याचं वृत्त आलं. पोलिस घटनास्थळी गेले असता मेश्राम यांचा मृतदेह असल्याचं समोर आलं.

पोलिसांचा तपास सुरु

कुटुंबियांना याबाबतची माहिती कळवली आहे. आता या आत्महत्येमागचं नेमकं काय कारण असावं? कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली असावी, याचा तपास सासवड पोलिस करत आहेत.

(Pune Commins College professor praful meshram Commit Suicide)

हे ही वाचा :

म्होरक्या येरवडा तुरुंगात, टोळीच्या सदस्यांची मौजमजेसाठी चोरी, दोघे अटकेत

व्यापारी गाळे मिळवण्यासाठी तलवारी नाचवत जीवघेणा हल्ला, इंदापुरात थरार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.