Pune Crime : पुण्यात काय चाललय? विवाहित महिलेच अपहरण, कर्जतच्या जंगलात नेऊन अत्याचार
Pune Crime : पुण्यात काय चाललय? कायदा-सुव्यवस्थेचा धाक राहिला नसल्याच चित्र आहे. महिलांविरोधात एकापाठोपाठ एक धक्कादायक गुन्हे घडत आहेत. कर्जत येथील जंगलात नेऊन विवाहित महिलेवर अत्याचार करण्यात आला.
पुण्यात महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांच सत्र कमी झालेलं नाही. एकापाठोपाठ एक धक्कादायक गुन्ह्यांची मालिका सुरुच आहे. पुण्यात आधी स्कूल व्हॅनमध्ये चिमुकल्या मुलींसोबत शोषणाची घटना घडली. त्यानंतर बोपदेव घाटातमित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरूणीवर तिघांनी मिळून सामूहिक अत्याचार केला. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेच अपहरण करण्यात आलं. जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. महिलेला मारहाण करण्यात आली. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
कर्जत येथील जंगलात नेऊन महिलेवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींमध्ये एक महिला सुद्धा आहे. पीडित महिला विवाहित असून ती कुटुंबासोबत राहते. पुरुष आरोपी 36 तर महिला आरोपी 32 वर्षांची आहे. दोघांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यात मागच्या काही दिवसात काय घडलय?
आरोपी पीडित महिलेच्या ओळखीचा होता. आपल्या कारमधून तो पीडित महिलेला जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. त्याने महिलेला मारहाण करुन घरात दोन दिवस डांबून ठेवलं. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून अत्याचाराचा प्रयत्न केला. पुणे हे संस्कृत शहर मानलं जातं. पण आता पुण्यात काय चाललय? असा प्रश्न निर्माण होतोय. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणीवर सुद्धा बलात्कार झाला. बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना पोलीस अजून शोधू शकलेले नाही. पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा धाक राहिला नसल्याच चित्र आहे.