Pune Crime : ‘माझ्या अंगात देव येतो सांगत…’, महिलेवर बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime : पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. याआधी सुद्धा पुण्यात महिलांविरोधात असे गुन्हे घडले आहेत. कठोर कायदे बनवूनही घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही.
महिलांविरोधात घडणारे गुन्हे रोखण्यासाठी अनेक कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. कठोर कायदे बनवण्यात आले आहेत. मात्र, तरीही घडणाऱ्या गुन्ह्यांच प्रमाण कमी झालेलं नाही. पुण्याच्या राजगुरुनगर भागात दोन अल्पवयीन मुलींसोबत घडलेल्या घटनेमुळे आधीच नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. बीअर बारमध्ये काम करणाऱ्या 54 वर्षीय आरोपीने त्याच्या घराबाहेर खेळणाऱ्या दोन मुलींची अत्याचार केले, नंतर त्यांची निर्घृण हत्या केली. आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावं, यासाठी संतप्त नागरिकांना आंदोलन कराव लागलं होतं.
ही घटना ताजी असताना पुण्यात एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माझ्या अंगात देव येतो असं सांगून चाकूच्या धाकावर महिलेवर बलात्कार करण्यात आला. महिलेने या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
बोपदेव घाटातही झालेला असाच प्रकार
काही महिन्यापूर्वी पुण्यातील बोपदेव घाटात एका तरुणीसोबत बलात्काराची घटना घडली होती. ही तरुणी आणि तिचा मित्र रात्री फिरण्यासाठी आले होते. यावेळी ती तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत त्याला मारहाण करण्यात आली. त्या तरुणाचा शर्ट काढून त्याचे हातपाय बांधण्यात आले. यानंतर तीन आरोपींनी परराज्यातून पुण्यात शिकायला आलेलल्या त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता.