काळी जादूची बहाणा, महिलेस गुंगीचे औषध देऊन काढले अश्लिल फोटो, ब्लॅकमेल करून 15 लाख उकळले
Pune Crime newsतक्रारदार आणि आरोपी दाम्पत्य ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन तुमच्या घरावर काळी जादू झाल्याचे सांगण्यात आले. काळी जादू नष्ट करतो, असे सांगून आरोपी पुजेसाठी फिर्यादी यांच्या घरी आले.
पुणे शहरातील एका महिलेबाबत परिचित व्यक्तीकडूनच फसवणूक झाली आहे. घरावर केलेली काळी जादू काढण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेला आणि लहान मुलीला गुंगीचे सरबत पिण्यास दिले. महिला बेशुद झाल्यानंतर तिचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून 15 लाख 30 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 14 डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत वानवडी परिसरातील रहेजा गार्डन सोसायटीत घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी वेगेवगळ्या कलमांतर्गत उत्तर प्रदेशातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दोन जणांवर गुन्हा दाखल
याबाबत 28 वर्षीय महिलेने रविवारी (दि.12) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यावरून कृष्णनारायण तिवारी (वय-30) अंतिमा कृष्णनारायण तिवारी (दोघे रा. रामभवन तिवारी, शक्तिनगर, पटवालिया गोंडा, उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
असे सुरु केले ब्लॅकमेल करणे
तक्रारदार आणि आरोपी दाम्पत्य ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन तुमच्या घरावर काळी जादू झाल्याचे सांगण्यात आले. काळी जादू नष्ट करतो, असे सांगून आरोपी पुजेसाठी फिर्यादी यांच्या घरी आले. त्यांनी महिलेला व त्यांच्या लहान मुलीला पिवळ्या रंगाचे कडू चव असलेले गुंगी आणणारे सरबत पिण्यास दिले. सरबत पिल्यानंतर दोघी मायलेकी बेशुद्ध झाल्या. त्यानंतर आरोपीने त्यांचे कपडे काढून मोबाईलमध्ये त्यांचे अश्लील फोटो काढले. हे फोटो फिर्यादीच्या मोबाईलवर पाठवले होते.
वेळोवेळी ऑनलाईन पैसे पाठवले
दरम्यान, हे फोटो कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्वांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांना ब्लॅकमेल करुन वेळोवेळी पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही, तर फिर्यादी व मुलीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. महिलेने धमकीला घाबरून वेळोवेळी ऑनलाईन पैसे पाठवले. आरोपींनी महिलेच्या घरातील सोन्याचे दागिने व कॅमेरा असा एकूण 15 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल नेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे करीत आहेत.