25 कोटी रुपये प्रभाकर साईलनेच घेतले, KP गोसावीचा खळबळजनक आरोप

| Updated on: Oct 28, 2021 | 1:20 PM

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या के पी गोसावीने एका व्हिडीओच्या माध्यमातून पंच प्रभाकर साईलवर धक्कादायक आरोप केले आहेत. प्रभाकर साईलनेच 25 कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप केपी गोसावीने केला आहे. याअगोदर पंच प्रभाकर साईलने के पी गोसावीवर 25 कोटी डीलचा आरोप केला होता. हे सगळे आरोप केपी गोसावीने फेटाळून लावले आहेत.

25 कोटी रुपये प्रभाकर साईलनेच घेतले, KP गोसावीचा खळबळजनक आरोप
केपी गोसावी
Follow us on

मुंबई :  आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या के पी गोसावीने एका व्हिडीओच्या माध्यमातून पंच प्रभाकर साईलवर धक्कादायक आरोप केले आहेत. प्रभाकर साईलनेच 25 कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप केपी गोसावीने केला आहे. याअगोदर पंच प्रभाकर साईलने के पी गोसावीवर 25 कोटी डीलचा आरोप केला होता. हे सगळे आरोप केपी गोसावीने फेटाळून लावले आहेत.

प्रभाकर साईलला गेल्या 5 दिवसांत कोणत्या ऑफर आलेल्या आहेत. कुणी किती पैसे घेतले प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन्ही भावांचे CDR रिपोर्ट काढावेत, त्यांचे कॉन्वरसेशन काढावेत, म्हणजे सगळं काही समोर येईल, असं एक व्हिडीओ जारी करत केपी गोसावीने म्हटलं आहे.

केपी गोसावीने काय म्हटलं?

“त्याने जे काही आरोप केले आहेत, ते सगळे तथ्यहीन आहेत. माझीही फोन कॉल हिस्ट्री तपासा. माझा इम्पोर्ट-एक्स्पोर्टचा व्यवसाय आहे. त्यासंबंधी पैशांचा व्यवहार असायचा. साईल ने आण करायचा. पण 2 तारखेनंतर माझी चॅट तपासून बघा, त्याच्याही चॅट तपासून बघा. माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे, जर तुम्ही ही केस हातात घेतली आहे तर साईलबद्दलची सगळी माहिती काढा आणि त्याच्यावर कारवाई करा. त्याच्यामागे कोण मंत्री आहे, याचीही पोलिस चौकशी झाली पाहिजे.”

“मी एक मराठी आहे, माझ्यावर जर आरोप होत असतील तर कोणत्याही मंत्र्याने माझ्यापाठीमागे उभा रहावं. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उभं राहावं. आणखी एकदा मुंबई पोलिसांना विनंती करतोय, साईलचे सगळे फोन रेकॉर्ड्स काढा. यातून सगळं काही बाहेर येईल, जे आरोप केलेत ते किती खोटे आहेत, हे ही कळेल”

पुणे पोलिसांकडून आर्यन खानला बेड्या, दुपारी 3 वाजता कोर्टात हजर करणार

आर्यन खान प्रकरणातील पंच केपी गोसावी याला अटक केल्यानंतर अखेर पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी आणण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे गोसावीला जामीन मिळतो की पोलीस कोठडी? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केपी गोसावीला आज सकाळीच अटक केल्यानंतर त्याला आज पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलं. पोलीस आयुक्तालयात त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. चौकशीनंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर दुपारी 3च्या सुमारास त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे, अशी माहिती चिन्मय देशमुख प्रकरणातील वकील हर्षल गरुड यांनी सांगितलं.

गोसावी नेमका कोण?

केपी अर्थात किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला होता.

(25 crore was taken by Prabhakar Sail KP Gosavi sensational allegation)

हे ही वाचा :

केपी गोसावी पोलीस आयुक्तालयात, 3 वाजता कोर्टात हजर करणार; जामीन होणार?