पुण्यात मार्केट यार्ड परिसरात गोळीबार, 28 लाखांची रोख रक्कम लुटली
एक राऊंड फायर करत आरोपींनी कार्यालयातील सुमारे 28 लाखांची रक्कम लुटली आणि तेथून पसार झाले. आरोपींना पकडण्यासाठी पोलील कार्यालयातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
पुणे : पुण्यात गोळीबार करत लाखोंची रक्कम लुटल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे. पी.एम. अंगडिया कार्यालयात ही गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबार करत आरोपींनी अंगडिया कार्यालयातील तब्बल 28 लाखांची रक्कम लुटून नेली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरु केला आहे. लूट केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहे.
5 ते 6 आरोपी सकाळी कार्यालयात घुसले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी कुरिअरचे कार्यालय आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तोंडावर मास्क लावलेले 5 ते 6 आरोपी पी.एम.अंगडिया यांच्या कार्यालयात घुसले. आल्यानंतर त्यांनी रोकड तपासली.
एका आरोपीने कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून बाहेर काढलं. आरोपींनी कार्यालयात एक राऊंड फायर करत काच फोडली.
एका राऊंड फायर करत आरोपींनी 28 लाख लुटले
एक राऊंड फायर करत आरोपींनी कार्यालयातील सुमारे 28 लाखांची रक्कम लुटली आणि तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मार्केट यार्ड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु
आरोपींना पकडण्यासाठी पोलील कार्यालयातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. सुदैवाने यात कुणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही.
कोल्हापूरमध्येही हुल्लडबाजांकडून गोळीबार
कोल्हापूरच्या उत्तूरजवळ हुल्लडबाजी तरुणांनी मध्यरात्री हवेत गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हालेवाडी फाट्याजवळ ही घटना घडली.
तरुणांचा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या हॉटेल मालकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न देखील तरुणांनी केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. आजरा पोलिसांनी नाकाबंदी संशयित तरुणांना ताब्यात घेतलं आहे.