वाकडमध्ये 28 वर्षीय महिला पोलिसाची आत्महत्या, पिंपरी चिंचवड पोलिस दलात खळबळ
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केलीय. दुपारी दीडच्या सुमारास वाकडमध्ये ही घटना समोर आली. या आत्महत्येने पिंपरी चिंचवड पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे. (28 year old female police commits suicide in Wakad Pimpari Chinchwad) श्रद्धा जायभाये असं 28 वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. […]
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केलीय. दुपारी दीडच्या सुमारास वाकडमध्ये ही घटना समोर आली. या आत्महत्येने पिंपरी चिंचवड पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे. (28 year old female police commits suicide in Wakad Pimpari Chinchwad)
श्रद्धा जायभाये असं 28 वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नेमकी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीय.
श्रद्धा यांचे पती केरळमध्ये नेव्हीत नोकरी करतात. त्यांना दोन वर्षाची एक मुलगी आहे. तिला पुण्यातील नातेवाईकांकडे ठेऊन, गळफास घेत श्रद्धा यांनी आपलं आयुष्य संपवलं. यासंदर्भात पोलिस पुढील चौकशी करत आहेत. (28 year old female police commits suicide in Wakad Pimpari Chinchwad)
(ही बातमी अपडेट होत आहे….)