Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indapur Firing & Loot : इंदापूरमध्ये पुणे-सोलापूर हायवेवर स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार, साडेतीन कोटीची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार

पटेल यांच्या फिर्यादीनुसार, इंदापूर पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांच्या विरोधात कलम 395 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासाकामी पाच पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

Indapur Firing & Loot : इंदापूरमध्ये पुणे-सोलापूर हायवेवर स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार, साडेतीन कोटीची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार
बियर प्यायल्यानंतर कारमध्येच बेशुद्ध, डॉक्टरांकडून मृत घोषितImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 1:08 AM

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर हायवेवर असलेल्या वरकुटे पाटी येथे अनोळख्या इसमाने स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार (Firing) केल्याची घटना घडली आहे. गाडीवर गोळीबार करत गाडीतील 3 कोटी 60 लाख रुपयांच्या रोख रकमेसह एकूण 3 कोटी 60 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून (Loot) चोरट्यांनी पोबारा केला आहे. भावेशकुमार अमृत पटेल (40) असे लुटण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पटेल यांच्या फिर्यादीनुसार, इंदापूर पोलीस (Indapur Police) ठाण्यात अनोळखी चोरट्यांच्या विरोधात कलम 395 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासाकामी पाच पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

गाडीवर गोळीबार करुन करोडोची रोकड लुटली

भावेशकुमार पटेल हे मूळचे गुजरात येथील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. पटेल हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीने गुरुवारी रात्री उशिरा सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने चालले होते. यादरम्यान इंदापूरजवळ मौजे वरकुटे पाटी गावच्या हद्दीमध्ये चार अनोळखी इसमांनी पायी चालत येऊन हातामध्ये लोखंडी टॉमी दाखवून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु पटेल यांनी गाडी भरधाव वेगात सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने नेली. यामुळे स्विफ्ट गाडी आणि टाटा कंपनीच्या गाडीमधून पाठलाग करत चोरट्यांनी स्कार्पिओ गाडीचा पाठलाग सुरु केला. मात्र गाडी थांबवली जात नसल्याने चोरट्यांनी गाडीवर गोळीबार करत गाडी अडवली. त्यानंतर गाडीमधील दोन व्यक्तींना हाताने मारहाण करत गाडीमधील 3 कोटी 60 लाख रुपये आणि जवळील 14 हजार रुपये, तसेच एक विवो कंपनीचा 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असे एकूण 3 कोटी 60 लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने खेचून चोरट्यांनी पोबारा केला.

याप्रकरणी भावेशकुमार पटेल यांनी इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेशकुमार धस, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस निरीक्षक घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी भेट दिली आहे. (3.5 Crore cash was looted after firing at a Scorpio car on the Pune-Solapur highway in Indapur)

हे सुद्धा वाचा

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.