Pimpri -Chinchwad crime | पाच जणांच्या टोळक्याने ब्लेडने वार करत युवकाला लुटले

फिर्यादी पिंपरी येथील आंबेडकर चौकातून नेहरूनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्यावेळी एका रिक्षात बसलेल्या पाच जणांच्या टोळक्याने त्यांना अडवले . त्यानंतर शिवीगाळ करत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी व बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली.

Pimpri -Chinchwad crime | पाच जणांच्या टोळक्याने ब्लेडने वार करत युवकाला लुटले
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 5:51 PM

पिंपरी – शहरात मागील काही महिन्यापासून कायदा व सुव्यवस्थेच्या तीन तेरा वाजल्या आहेत. शहरातील आंबेडकर चौक, पिंपरी येथे पाच जणांच्या टोळक्याने गॅरेजवाल्यावर हल्ला एक लाख 40 हजार 300 रुपयांचा माल लुटून नेला आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी घडली घटना फिर्यादी फय्याज राशद शहा (वय 29, रा. दत्तनगर, चिंचवड) याचे आंबेडकर चौक, पिंपरी येथे गॅरेज आहे. घटनेच्या दिवशी पहाटे तीनच्या सुमारास पिंपरी येथील आंबेडकर चौकातून नेहरूनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्यावेळी एका रिक्षात बसलेल्या पाच जणांच्या टोळक्याने त्यांना अडवले . त्यानंतर शिवीगाळ करत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी व बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी एवढ्यावरच न थांबता एका आरोपीने फिर्यादीच्या हातावर ब्लेड ने वॉर केले. त्यानंतर फिर्यादीकडे असलेली रोख रक्कम, पाकीट, मोबाईल, जॅकेट असा एकूण एक लाख 40 हजारांचा ऐवज आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतला व तिथून रिक्षा घेऊन पळून गेले. याप्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

गुन्हेगारांवर वचक हवा पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवर वचक न राहिल्याने शहरात गुंडांनी हौदस मांडला आहे. कधी नंग्या तलवारी काढत रात्र -अपरात्री स्थानिक सोसायट्यांमधून आरडा-ओरडा करता फिरतात. रस्त्यावरून जाणाऱ्या स्थानिक नागरिकां लुटण्याचे , शिविगाळ करण्याच्या प्रकारांमध्येही वाढ झालेली दिसून येत आहे. पोलीस प्रशासनानं याकडं लक्ष देत गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Nagpur crime | रक्षकच निघाला भक्षक! नोकरानेच उडवले 17 तोळे सोने; हुडकेश्वर पोलिसांनी कसा केला पर्दाफाश?

VIDEO | दोन कॉलेज युवतींची फ्री स्टाईल हाणामारी; एकमेकींच्या झिंज्या ओढल्या

राणेंना नोटीस देणाऱ्या पोलिसांवरच FIR दाखल करा, अन्यथा आम्ही खटला दाखल करु-फडणवीस

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.