Breaking ! कोयता हल्ल्याने पुणे हादरले, पुणे पोलिसांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!

| Updated on: Jun 28, 2023 | 1:53 PM

पुण्यात काल दिवसाढवळ्या एका तरुणीवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या घटनेनंतर पुणे पोलीस अधिकच सतर्क झाले आहेत. पुणे पोलिसांनी आज मोठे निर्णय घेतले आहेत.

Breaking ! कोयता हल्ल्याने पुणे हादरले, पुणे पोलिसांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!
Pune Police
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : पुण्यात काल एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. दिवसाढवळ्या एक तरुण हातात कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावला. एका तरुणाने जीव धोक्यात घालून आरोपीला पकडले. त्यामुळे सुदैवाने या तरुणीचे प्राण वाचले. आधीच दर्शना पवार हत्याकांडाने पुणे हादरलेले असतानाच काल हा प्रकार समोर आल्याने पुणेकर पुरते हादरून गेले आहेत. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. पोलिसांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

तरुणीवर कोयत्याने हल्ला झाल्यानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. शहरातील सर्व पोलीस चौक्या 24 तास आणि सातही दिवस सुरू ठेवण्याचा पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पोलीस चौकी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय अजून 150 बीट मार्शल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील 25 बीट मार्शल दामिनी पथकासाठी असणार आहेत. याशिवाय कोणत्याही तक्रारीकडे कानाडोळा न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

समुपदेशनासाठी वर्ग

दर्शन पवार ही एमपीएससीला राज्यात सहावी आली होती. तिचा मारेकरी राहुल हंडोरेही एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. दोघेही चांगले मित्र होते. एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. तरीही राहुलने दर्शनाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या विद्यार्थांचे समुपदेशन करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतली आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी स्वतंत्र वर्ग चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितलं.

काय घडलं काल?

सदाशिव पेठेतील पेरू गेट जवळच्या पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एक तरुण आणि तरुणी गाडीवरून जात असताना आरोपीने त्यांची गाडी अडवली. या तरुणीशी बोलायचं सांगून त्याने तिच्याशी हुज्जत घातली. मात्र, तिने बोलण्यास नकार दिल्याने त्याने तिच्यावर कोयता उगारला.

त्यामुळे ही मुलगी किंचाळली आणि सैरावैरा धावू लागली. ही पळत असतानाच आरोपी तिच्या मागे कोयता घेऊन पळाला. यावेळी आजूबाजूला लोकं होते. कुणीही तिच्या मदतीला धावले नाही. ही तरुणी जीवाच्या आकांताने पळत होती. हा प्रकार लेशपाल जवळगे या तरुणाने जीवमुठीत घालून तिचे प्राण वाचवले. लेशपालने या आरोपीला पकडून पोलीस चौकीत नेले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. विश्राम बाग पोलिसांनी या आरोपीचा ताबा घेतला असून अधिक तपास करत आहे.