Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati Crime : बारामतीत अर्धवट अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळला; आत्महता की घातपात ? याबाबत तपास सुरु

काही कारणास्तव त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी सांगितले. याप्रकरणी शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Baramati Crime : बारामतीत अर्धवट अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळला; आत्महता की घातपात ? याबाबत तपास सुरु
वार्ड प्रमुखाला अनेक महिने ओलीस ठेवल्याचा आमदारावर आरोप.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 11:47 PM

बारामती : बारामतीत जळोची येथील स्मशानभूमीच्या पाठीमागे अर्धवट जळाले (Burning)ल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह (Deadbody) आढळून आला आहे. यामुळे बारामतीत खळबळ उडाली आहे. अभिजीत विजय खरात असे मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो इंदापूर तालुक्यातील अंथुणे येथील रहिवासी आहे. कामानिमित्त तो अनेक वर्षांपासून बारामतीत राहत होता. काही कारणास्तव त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांनी सांगितले. याप्रकरणी शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, हा घातपात आहे की आत्महत्या हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होईल. (A man’s body was found in Baramati, An investigation is underway)

नांदेडमध्ये वकिलाचा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर आत्मदहनाचा प्रयत्न

न्यायाधीशाकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत एका वकिलाने न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच वकिलाला रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. ही घटना कोर्टात लोक अदालत सुरू असताना आज सकाळी घडली. जयपाल ढवळे असे या वकिलाचे नाव आहे. त्यांच्या अशीलाचा खटला न्या. बांगर यांच्या कोर्टात सुरु होता. परंतु बांगर यांच्याकडून वकिलांना अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप करीत ढवळे यांनी सकाळी अंगावर पेट्रोल ओतले. यावेळी वजीराबादच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी लगेच त्यांना पकडले. त्यानंतर त्यांना ठाण्यात नेण्यात आले.

नागपुरात प्रेमी युगुलाची धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या

प्रेमाला घरच्यांनी विरोध केल्यामुळे प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमधील नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. 18 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय तरुणीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली. दोघांनीही हातात हात घालून धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. दोघेही शहरातील जयभीम चौक येथील रहिवासी आहेत. दोघांच्या घरच्यांना प्रेमाची कुणकुण लागल्याने आणि त्यांचा विरोध असल्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. (A man’s body was found in Baramati, An investigation is underway)

इतर बातम्या

Pune Crime | पुण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचिकवर बलात्कारचाआरोप केलेल्या तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime | काळजाचा ठोका चुकवणारी घटना: दौंड तालुक्यात स्कूल बसला अपघात, विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.