Pimpari Beaten : दहिहंडीसाठी 500 रुपये वर्गणी दिली नाही म्हणून दुकानदाराला मारहाण, आरोपी अटक

वाकड परिसरातील तरुणांचा एक ग्रुप मंगळवारी दहिहंडी उत्सवासाठी वर्गणी गोळा करत होता. यावेळी हा ग्रुप स्वीट मार्टच्या दुकानात वर्गणी मागण्यासाठी गेला. यावेळी त्यांनी दुकानदाराकडे 500 रुपये वर्गणी मागितली. मात्र दुकानदाराने 200 रुपयेच दिले.

Pimpari Beaten : दहिहंडीसाठी 500 रुपये वर्गणी दिली नाही म्हणून दुकानदाराला मारहाण, आरोपी अटक
दहिहंडीसाठी 500 रुपये वर्गणी दिली नाही म्हणून दुकानदाराला मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 11:38 PM

पिंपरी : दहिहंडी उत्सवासाठी 500 रुपये वर्गणी (Subscription) दिली नाही म्हणून स्वीट मार्ट (Sweet Mart) दुकानदाराला मारहाण (Beating) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधील वाकडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी दुकानाची तोडफोड करत गल्ल्यातील पैसे काढून नेले. दुकानमालकाने पोलिसांनी सहा आरोपींना अटक केले आहे. तर दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रसाद राऊत, मनीष उर्फ मन्या कदम, माऊली उपल्ले, यश रसाळ, रोहित शिंदे उर्फ बॉण्ड, सुनील शेट्टी, विजय तलवारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दुकानाची तोडफोड करत गल्ल्यातील रोकड नेली

वाकड परिसरातील तरुणांचा एक ग्रुप मंगळवारी दहिहंडी उत्सवासाठी वर्गणी गोळा करत होता. यावेळी हा ग्रुप स्वीट मार्टच्या दुकानात वर्गणी मागण्यासाठी गेला. यावेळी त्यांनी दुकानदाराकडे 500 रुपये वर्गणी मागितली. मात्र दुकानदाराने 200 रुपयेच दिले. यामुळे या 10 ते 12 जणांच्या टोळक्याला राग आला. तुम्हाला माहित नाही का आम्ही एरियातील भाई आहोत, असे दुकानदाराला मारहाण करत दुकानाची तोडफोड केली. त्यानंतर दुकानातील गल्ल्यातील 10 ते 12 हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाले. याप्रकरणी काल रात्री उशिरा वाकड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केले आहे तर अन्य दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जर कुठल्याही मंडळ कार्यकर्त्यांनी दुकानदार किंवा व्यवसायिकांकडे बळजबरीने वर्गणी मागण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. (A shopkeeper was beaten up for not paying a subscription of Rs 500 for Dahihandi in Pimpri Chinchwad)

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.