ठेकेदाराला लाकडाच्या दांड्याने मारहाण, खंडणीसाठी धमकी; चार महिने मोकाट राहिलेला आरोपी ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

गुन्हा दाखल होऊनही हा आरोपी चार महिन्यांपासून खुलेआम फिरत राजकीय लोकांची नावे सांगून पोलिसांना गुंगारा देत होता.

ठेकेदाराला लाकडाच्या दांड्याने मारहाण, खंडणीसाठी धमकी; चार महिने मोकाट राहिलेला आरोपी 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात
ठेकेदाराचे अपहरण करत खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 6:37 PM

पुणे / सुनील थिगळे (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात एका कंपनीच्या ठेकेदाराचे अपहरण (Kidnapping) करून खंडणीसाठी मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपीला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. महेश जगताप असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या अपहरणकर्त्याचे नाव आहे. सणसवाडी येथील कंपनीच्या ठेकेदाराचे अपहरण करुन निर्जन ठिकाणी नेऊन त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी (Ransom) घेतल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आला होता.

चार महिन्यांपासून आरोपी देत होता गुंगारा

गुन्हा दाखल होऊनही हा आरोपी चार महिन्यांपासून खुलेआम फिरत राजकीय लोकांची नावे सांगून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर महेश जगतापला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला नुकतेच यश आले आहे.

कामावरुन घरी जात असताना ठेकेदाराचे अपहरण

सणसवाडी येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे ठेकेदार फुलसिंग यादव हे 4 मे 2022 रोजी कंपनीतून रात्रीच्या सुमारास घरी जात होते. यावेळी काही युवकांनी त्यांना निर्जनस्थळी घेऊन जात शिवीगाळ, दमदाटी करुन लाकडी दांडक्याने मारहाण केली.

हे सुद्धा वाचा

दोन लाख रुपये खंडणी उकळली

तसेच महेश जगताप माहित आहे का आम्ही त्याची माणसे आहोत, तुम्ही आम्हाला साडेतीन लाख रुपये द्यायचे नाहीतर मारून टाकण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून दोन लाख रुपयांची खंडणी घेतली होती.

शिक्रापूर पोलिसांकडून आरोपी अटक

याबाबत फुलसिंग यांची पत्नी रेवती यादव यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील काही आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले. फुलसिंग यादव मूळचे राजस्थानमधील असून कामानिमित्त पुण्यात राहतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.