गुन्हेगारी टोळ्यांवर पुणे पोलिसांची धडक कारवाई! पुण्यात ‘मोक्का’ची ‘हाफ सेंच्युरी’ पूर्ण

पुणे (Pune) शहरात फोफावत असलेल्या गुन्हेगारीला (Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याचा दंडुका उगारला आहे. गेल्या 11 महिन्यांत पुण्यातल्या कुख्यात टोळ्यांना आवर घालण्यासाठी तब्बल 50 टोळ्यांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हेगारी टोळ्यांवर पुणे पोलिसांची धडक कारवाई! पुण्यात 'मोक्का'ची 'हाफ सेंच्युरी' पूर्ण
गेल्या 11 महिन्यांत पुण्यातल्या कुख्यात टोळ्यांना आवर घालण्यासाठी तब्बल 50 टोळ्यांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 11:12 AM

पुणे : पुणे (Pune) शहरात फोफावत असलेल्या गुन्हेगारीला (Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याचा (मोक्का) (Maharashtra Control of Organised Crime Act) दंडुका उगारला आहे. गेल्या 11 महिन्यांत पुण्यातल्या कुख्यात टोळ्यांना आवर घालण्यासाठी तब्बल 50 टोळ्यांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे साडेतीनशे गुडांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. गुंडांच्या टोळ्यांबरोबरच, सोनसाखळी चोरी, घरफोड्या, फसवणूक, दरोडा टाकणाऱ्या गुंडांचा या कारवाईत समावेश आहे. सोमवारी पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या बल्लुसिंग टाक टोळीवर 50 वी मोक्का कारवाई केली आहे. (Action has been taken against 50 criminal gangs under MCOCA in In Pune)

पिंपरी चिंचवडमध्ये 20 मोक्का कारवाया

संघटित टोळी तयार करून टोळीयुद्ध, खंडणी, खून, फसवणूक, खुनी हल्ले, जमिनी बळकावणे आणि असे इतर गंभीर गुन्हे करून समाजात दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी 14 फेब्रुवारी 1999 ला राज्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याची म्हणजेच मोक्का कायद्याची निर्मिती केली. तेव्हापासून पुण्यात या कायद्याअन्वये 172 कारवाया झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात (Pimpi Chinchwad Police Commissioner) गेल्या सहा महिन्यांत 20 टोळ्यांविरोधात यास्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे.

बल्लुसिंग टाक टोळीवर 50 वी कारवाई

बल्लुसिंग टाक याच्यासह त्याच्या टोळीतल्या सहा जणांविरोधात पुणे पोलिसांनी सोमवारी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्याच्यावर पुणे आणि परिसरात दरोडे आणि लुटमारीचे तब्बल 68 गुन्हे दाखल आहेत. गेल्या महिन्यात या टोळीने कोथरूड परिसरात सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न केला होता. टाक टोळीतल्या गुन्हेगारांवर खुनी हल्ले, दरोडे आणि लुटमारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

धडक कारवाईचा गुन्हेगारांनी घेतला धसका

पोलिसांच्या या धडक कारवाईचा गुन्हेगारांनी चांगलाच धसका घेतला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात आपल्या पदाचा कार्यभार घेतला. कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कायद्यानुसार कारवाईचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातली गुन्हेगारी कमी होण्यास हातभार लागणार आहे. कारवाई करताना अभ्यासपूर्ण आणि न्यायालयात टिकेल अशा स्वरूपात मोक्का लावला जात आहे असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं.

एका वर्षाच्या आत 50 टोळ्यांवर मोक्का

गेल्यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान पुण्यातल्या 7 टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली तर टोळ्यांतल्या 54 गुन्हेगारांना अटक करण्यात आली. यावर्षी जानेवारीपासून तब्बल 43 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे आणि यामध्ये 303 आरोपी अटक आहेत. नीलेश घायवळ टोळी, सराईत सोनसाखळी चोर राजाभाऊ राठोड टोळी, सूर्यकांत उर्फ बंडु आंदेकर टोळी, बिरजूसिंग दुधानी टोळी, सचिन पोटो टोळी, शुभम कामटे टोळी, अली अकबर इराणी टोळी, मतीन सय्यद टोळी, बंटी पवार टोळी, विवेक यादव टोळी अशा काही मोठ्या टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

चायनिजची गाडी चालवून बंद घरं शोधायची, घरफोडीतून 77 लाखांची माया, पुण्यात अट्टल चोरटा जेरबंद

फेरीवाल्याच्या कोयता हल्ल्यात दोन बोटं गमावली, ठाण्याच्या अतिरिक्त पालिका आयुक्त कल्पिता पिंपळेंची प्रकृती कशी?

#क्राईम_किस्से : Nitish Katara Murder | मैत्रिणीच्या भावांनी खून करुन मृतदेह जाळला, 2002 चे बहुचर्चित नितीश कटारा हत्याकांड

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.