रणजित जाधव, पुणे दि.29 जानेवारी 2024 | पुणे शहरात एमपीएससी पास तरुणी दर्शना पवार हिची हत्या काही महिन्यांपूर्वीच झाली होती. त्यानंतर पुन्हा पुणे शहरात त्याच कारणामुळे खून झाला आहे. प्रेयसी सोडून जाईल, लग्न करणार नाही, यामुळे आयटी अभियंता तरुणीची हत्या करण्यात आली. लॉजमध्ये प्रेयसीवर पाच गोळ्या मारल्यानंतर तिचा प्रियकर घटनास्थळावरुन प्रसार झाला. परंतु पाच गोळ्यांचा आवाज लॉजमधील कोणाला आला नाही. आयटी हब हिंजवडीत एका आयटी अभियंत्या युवतीला गोळ्या मारुन तिचा प्रियकर मुंबईत निघून गेला. परंतु मुंबई पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पुणे शहरातील एका मोठ्या आयटी कंपनीत वंदना द्विवेदी ही 26 वर्षीय तरुणी अभियंता म्हणून कार्यरत होती. तिची तिच्या गावातील म्हणजे लखनऊमधील युवक ऋषभ निगम याच्याशी ओळख होती. दोघे काही वर्षांपासून प्रेम संबंधात गुंतले होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये वंदना आणि ऋषभ यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.
दर्शना पवार हिचा प्रियकर राहुल हंडोरे तिच्या गावातील होता. तो तिच्याशी लग्न करण्याची मागणी करण्याची मागणी करत होता. त्या पद्धतीने वंदनाचा प्रियकर ऋषभ यालाही तिच्याशी लग्न करायचे होते. परंतु वंदना सॉफ्टवेअर इंजीनियअर होती. ऋषभ मात्र ब्रोकर होता. वंदना आपल्याला सोडून जाईल, असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याने तिला पाच गोळ्या झाडत तिची हत्या केली आणि तो पसार झाला. दर्शना पवार एमपीएससी पास तर हिचा प्रियकर राहुल हंडोरे याला एमपीएससीत अपयश आले होते. दर्शना लग्न करत नसल्याने त्याने तिला संपवले. त्याचा कारणामुळे वंदना याला ऋषभ याने संपवले.
वंदनाचा मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्याने खळबळ उडाली. तिची हत्या करणाऱ्या प्रियकराला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रेम संबंधांतून हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले. तसेच ऋषभ याला वंदनाचे इतर प्रेम संबंध असल्याचा संशय ही होता. त्यामुळे ऋषभ याने वंदना हिला हिंजवडी मधल्या एका लॉजवर बोलवले आणि २७ तारखेला रात्री तिची पाच गोळ्या घालून हत्या केली.