Pune Crime : तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला संपवण्याचा प्रयत्न, धक्कादायक घटनेने पुणे हादरले !

पुण्यातील मुंढवा भीमनगरमधील म्हाडा कॉलनीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime : तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला संपवण्याचा प्रयत्न, धक्कादायक घटनेने पुणे हादरले !
विकृताकडून शवागृहातील मृतदेहांवर बलात्कारImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 5:19 PM

पुणे : बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पुण्यातील मुंढवा भीमनगरमधील म्हाडा कॉलनीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. रमजान खलील पटेल असे आरोपीचे नाव आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ माजली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

2018 मध्ये घडली होती बलात्काराची घटना

आरोपी रमजान पटेल याने 2018 मध्ये पीडित महिलेवर बलात्कार केला होता. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील पांगरी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने रमजान विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

आरोपीने तक्रार मागे घेण्यासाठी महिलेकडे तगादा लावला होता

ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीने गेल्या अनेक दिवसांपासून पीडित महिलेच्या मागे तगादा लावला होता. मात्र महिला तक्रार मागे घ्यायला तयार नव्हती. याच कारणातून आरोपीने दाखल केलेली बलात्काराची तक्रार मागे घे म्हणत पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

मुंढवा पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

याप्रकरणी आरोपीवर पुण्यातील मुंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेवरुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे यावरुन दिसून येते.

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.