Krishna Prakash : पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याविरोधात आणखी एक पत्र

तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील विविध जमीन व्यवहारामधून मोठी माय गोळा केल्याचा गंभीर आरोप आमदार बनसोडे यांनी केलाय. तसेच अनेक बाबींचा ह्या पत्रात उल्लेख करत कोट्यवधी रुपये जमा केल्याचा आरोप आमदार बनसोडे यांनी केलाय. हे पत्र आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना दिलंय.

Krishna Prakash : पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याविरोधात आणखी एक पत्र
कृष्ण प्रकाश यांच्या विरोधात आणखी एक पत्रImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 10:37 PM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांच्या बदलीनंतर 200 कोटी रुपये वसुलीचे बनावट पत्र व्हायरल झाल्यानंतर आता त्याच्या बाबतीत अजून एक पत्र आलं समोर आले आहे. पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी हे पत्र लिहलंय. ह्या पत्रात आमदार बनसोडे यांनी कृष्ण प्रकाश यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील विविध जमीन व्यवहारामधून मोठी माय गोळा केल्याचा गंभीर आरोप आमदार बनसोडे यांनी केलाय. तसेच अनेक बाबींचा ह्या पत्रात उल्लेख करत कोट्यवधी रुपये जमा केल्याचा आरोप आमदार बनसोडे यांनी केलाय. हे पत्र आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना दिलंय. कृष्ण प्रकाश एका बनावट पत्राने आधीच अडचणीत असताना आणखी एक पत्र समोर आल्याने ते बदलीनंतरही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. (Another letter from the then Pimpri Chinchwad Commissioner of Police Krishna Prakash)

आमदार बनसोडे यांनी काय म्हटलंय पत्रात ?

पिंपरी चिंचवड शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट होता. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन हफ्ते वसुली व वसुली रॅकेटची माहिती दिली. याची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई केली आणि कृष्ण प्रकाश यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. सुरुवातीला अवैध धंदे बंद करुन दहशत मोडीत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कामाबद्दल मोठा प्रचार व प्रसार करत त्यांनी जनतेची वाहवा मिळवली. अल्प कालावधीत त्यांनी जनतेची सहानुभूती मिळवली. शहरात बदल घडेल असे वाटले, पण उलटेच झाले. खोटे गुन्हे नोंदवणे, नामांकित बँकांच्या पदाधिकाऱ्यांवर एकाच वेळी अनेक गुन्हे दाखल करुन इतर पदाधिकाऱ्यांकडून मोठी रक्कम उकळणे, सामान्य जमिन मालकांच्या जमिनींवर पोलिस बळाचा वापर करुन बिल्डरांना ताबा मिळवून देणे आणि त्या बदल्यात भागीदारी घेणे, फ्लॅट घेणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे अनेक कारनामे सुरु झाले.

दुसऱ्या अधिकाऱ्याने केलेली कामगिरी स्वतःच्या नावावर घेऊन स्वतःची सवंग प्रसिद्धी मिळवून सामान्य जनतेमध्ये नावलौकिक मिळवायचा. चांगल्या वित्तीय संस्थांच्या सिव्हिल मॅटरबाबत गुन्हे दाखल करुन अनेक कोटी रुपये उकळले. मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसायात सापडलेल्या मुलींचा गैरवापर झाल्याच्याही तक्रारी आपल्याकडे आल्याचे बनसोडे म्हणाले. आयुक्तांचा खरा चेहरा समाजापुढे उघड झाला पाहिजे. परंतु पोलिसांच्या दहशतीपायी नागरिक पुढे येण्यास तयार नाहीत.

हे सुद्धा वाचा

याआधीही कृष्ण प्रकाश यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले होते

याआधी अर्जदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले होते. विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता असून यापासून मला संरक्षण मिळावे. मी तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून प्रमुख पद माझ्याकडे सोपविण्यात आले. शहरातील जमिनी खरेदी विक्रीची प्रकरणे मला हाताळण्यास सांगितली. त्यातून येणारे कोट्यवधी रुपये मला स्वीकारण्यास सांगितले. आत्तापर्यंत कृष्ण प्रकाश यांच्यासाठी गोळा (वसुली) केलेली रक्कम 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला होता. (Another letter from the then Pimpri Chinchwad Commissioner of Police Krishna Prakash)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.