प्रेमसंबंध संपवले, मग युवतीवर कोयत्याने हल्लाचा प्रयत्न, सांस्कृतिक पुण्यात पुन्हा धक्कादायक प्रकार

Pune Crime: काही दिवसांपूर्वी पुण्यातील पेरुगेट पोलीस चौकीजवळ युवतीवर हल्ला झाला होता. त्यावेळी स्थानिक तरुणांनी त्या तरुणास पकडले. त्यामुळे ती तरुणी बचावली होती. त्यावेळी पेरुगेट पोलीस चौकीवर एकही पोलीस नव्हता. या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांनी काही जणांचे निलंबन केले होते. 

प्रेमसंबंध संपवले, मग युवतीवर कोयत्याने हल्लाचा प्रयत्न, सांस्कृतिक पुण्यात पुन्हा धक्कादायक प्रकार
या दुचाकीवर हल्लेखोर तरुण आले होते.
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 8:32 AM

पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर आहे. राज्याची नाही तर देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. परंतु पुणे शहराची वाटचाल आता पश्चात्य संस्कृतीकडे होऊ लागली आहे. एकतर्फी प्रेमातून हल्ले करण्याचे प्रकार पुण्यात वाढू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी एमपीएससी पास दर्शना पवार हिची एकतर्फी प्रेमातून हत्या झाली होती. त्यानंतर पुण्यातील पेरुगेट चौकीजवळ भरदिवसा तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला होता. त्यावेळी जमावाने हल्लेखोरांना पकडल्यामुळे ती युवती वाचली. आता पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून भरदिवसा अकरावीत शिकणाऱ्या युवतीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक 6 मध्ये ही घटना घडली. यावेळी महिलांनी आरडा-ओरडा केल्यामुळे दुचाकीवरुन आलेले आरोपी पळून गेले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

काय झाला प्रकार

पुणे येथील महेश सिद्धप्पा भंडारी (वय.22,रा. जनता वसाहत) याचे एका अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर प्रेम होते. ती मुलगी बोलत नाही, तिने प्रेमसंबंध संपवले, या रागातून महेश आणि आणखी एकाने तिला भररस्त्यात अडवले. तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या महिलांना आरडाओरड केली. यामुळे दुचाकीवरुन आलेले हे दोघे तरुण पळून गेले. परंतु जाताना त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. एका व्यक्तीला कोयता दाखवत धमकवले. कोयता फेकत दहशत निर्माण केली.

तरुणाला पोलिसांनी केली अटक

कोयता हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा तरुण तळजाई टेकडी परिसरात पळून गेला होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मुलगी बोलत नसल्यामुळे हा प्रकार केल्याचे त्याने प्राथमिक चौकशीतून सांगितले. त्याच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. महेश जनता वसाहतीत राहत आहे. हा सर्व प्रकार सुभाषनगर भागात घडल्यानंतर या परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वी पुण्यातील पेरुगेट पोलीस चौकीजवळ युवतीवर हल्ला झाला होता. त्यावेळी स्थानिक तरुणांनी त्या तरुणास पकडले. त्यामुळे ती तरुणी बचावली होती. त्यावेळी पेरुगेट पोलीस चौकीवर एकही पोलीस नव्हता. या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांनी काही जणांचे निलंबन केले होते.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.