बारामती मतदार संघात मतदान संपताच गोळीबार, दुचाकीवर आलेल्या लोकांनी गोळीबार करुन…

Pune Crime News: आरोपींना गोळीबार का केला? हे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. गोळीबार केलेल्या आरोपींचा वारजे पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. परंतु गोळीबाराच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

बारामती मतदार संघात मतदान संपताच गोळीबार, दुचाकीवर आलेल्या लोकांनी गोळीबार करुन...
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 9:32 AM

संपूर्ण देशाचे लक्ष मंगळवारी बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागले होते. बारामती लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरु असताना आरोप-प्रत्यारोप सुरु होते. यंदा बारामती मतदार संघात कमी मतदान झाले. परंतु मतदान संपल्यावर धक्कादायक घटना घडली आहे. बारामती लोकसभा मतदार संघात येणाऱ्या वारजे माळवाडी भागात गोळीबार झाला. या भागातील रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार केल्याची घटना रात्री १०.३० वाजता घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.

पुण्यात गुन्हेगारी वाढली

पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. किरकोळ कारणावरुन कोयता हल्ले झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या. परंतु गेल्या काही महिन्यांपासून गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यामुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवारी पुणे शहरातील भाग असलेल्या परंतु बारामती लोकसभा मतदार संघात येणाऱ्या वारजे येथील रामनगरमध्ये दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार केला. रात्री साडेदहा वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. आरोपींनी गोळीबार करुन मुंबई पुणे हायवेवरुन कात्रजच्या दिशेने पळ काढला.

काय आहे कारण

आरोपींना गोळीबार का केला? हे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. गोळीबार केलेल्या आरोपींचा वारजे पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. परंतु गोळीबाराच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

मागील महिन्यात तीन वेळा गोळीबार

पुणे शहरात मागील महिन्यात तीन वेळा गोळीबार झाला होता. जंगली महाराज रोडवर बांधकाम व्यावसायिक धीरज दिनेशचंद्र आरगडे यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. त्याचा तपास पोलिसांनी लावला. त्यानंतर हडपसरमध्येही दोन सैनिकांमध्ये वाद झाला होता. त्यातून भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला होता. त्यात एक जखमी झाला होता. त्यानंतर पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात असलेल्या भुमकर चौकात गोळीबार झाला होता. कडीपेटी मागितल्याच्या कारणातून गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.

फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.