मनोहर मामा भोसलेला दिलासा नाहीच, आणखी 3 दिवसांची पोलिस कोठडी

मनोहर उर्फ मामा भोसले याच्या पोलिस कोठडीत बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज आणखी तीन दिवसांची वाढ केली. 11 सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.

मनोहर मामा भोसलेला दिलासा नाहीच, आणखी 3 दिवसांची पोलिस कोठडी
मनोहर भोसले
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 3:38 PM

बारामती : संत श्री बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात दि. 10 सप्टेंबरपासून पोलिस कोठडीत असलेल्या मनोहर उर्फ मामा भोसले याच्या पोलिस कोठडीत बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज आणखी तीन दिवसांची वाढ केली. 11 सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.

पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने आज बारामती तालुका पोलिसांनी मनोहरमामाला न्यायाधिश एन. व्ही. रणवीर यांच्यापुढे हजर केले मागील वेळी प्रमाणे आजही मनोहर भोसले याच्या भक्तानी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. भोसले याच्या बाजूने ॲड. हेमंत नरुटे यांनी म्हणणे मांडले. सरकार पक्षाकडून ॲड. एन. पी. कुचेकर यांनी काम पाहिले.

सरकारी वकिलांकडून पोलिस कोठडीची मागणी

मनोहर भोसले याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत, त्यांना अटक करायची आहे, मनोहर भोसलेकडे गुन्ह्यातील रक्कम व अन्य बाबींचा तपास बाकी आहे, त्यामुळे पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी वकिलानी केली होती. न्यायालयाने ती मान्य करत त्यात तीन दिवसांची वाढ केली. शुक्रवारी १० सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे येथील एका फार्महाऊसवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मनोहर भोसले याला ताब्यात घेत बारामतीत आणत अटक केली होती.

फसवणूक आणि धमकीचे आरोप

बारामतीतील शशिकांत खरात याच्या वडीलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडीलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

याप्रकरणी भोसलेसह त्याचे साथीदार विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे फरार आहेत. या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा :

मनोहरमामा उर्फ मनोहर भोसलेसह तिघांवर बारामतीत गुन्हा दाखल, संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत केली फसवणूक

अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वरच्या व्हॅल्युएशनचे कागद लोकांसमोर का ठेवत नाहीत? किरीट सोमय्यांचा सवाल

Dr. BAMU विद्यापीठाच्या पीआरओचा प्रताप, विद्यार्थिनीशी अश्लिल चॅटिंगचा आरोप, विनयभंगाचा गुन्हा दाखल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.