पुणे शहरात मोठी कारवाई, मुंबईतून पुण्यात आलेले 138 कोटींचे सोने जप्त, हे सोने आहे कुणाचे?

Pune Crime News: शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सातार रोडवर तपासणी सुरु होती. त्यावेळी टेम्पोमध्ये दागिणे असलेले पांढऱ्या पोत्यांमध्ये बॉक्स सापडले. पोलिसांनी सोने जप्त केले तसेच टेम्पो चालकाला ताब्यात घेतले.

पुणे शहरात मोठी कारवाई, मुंबईतून पुण्यात आलेले 138 कोटींचे सोने जप्त, हे सोने आहे कुणाचे?
पुणे शहरात या टेम्पोमधून १३८ कोटींचे सोने जप्त
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 5:26 PM

महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजला आहे. एकीकडे उमेदवारांच्या याद्या आणि प्रचार सुरु आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून प्रत्येक हालाचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडणूक आयोग अन् पोलिसांची पथके सर्वत्र नाकाबंदी आणि तपासण्या करत आहेत. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी प्रशासनाकडून सुरू आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी पुणे शहराततील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. आता शुक्रवारी पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचे सोने पकडले गेले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सोने सापडल्यामुळे खळबळ माजली आहे.

सोने आहे कुणाचे?

पुणे शहरात नाक बंदी केली जात आहे. यावेळी सातारा रोडवर सहकार नगर येथे पोलिसांनी एमएच ०२ ईआर ८११२ टेम्पोची तपासणी केली. त्यामध्ये 138 कोटी रुपयांचे सोने सापडले. आता हे सोने कोणाचे आहे? ते सोने कोठून आले? हे सोने कुठे जात होते? त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, आम्ही सध्या कागदपत्रे तपासत आहोत. सध्या आयकर विभाग आणि निवडणूक आयोग चौकशी करत आहे. चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल

ते सोने खासगी कंपनीचे

पोलिसांनी जप्त केलेले सोने हे खाजगी कंपनीच असल्याची माहिती मळत आहे. या सोन्याबाबत कागदपत्रे देण्यास ती कंपनी तयार आहे. हे सोने घेऊन टेम्पो मुंबईवरून पुण्यात आला होता. यावेळी निवडणुकीमुळे पुण्यात नाकाबंदी सुरु असताना त्यात सोने सापडले. आता आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाला कागदपत्र कंपनीने मेले केले असल्याचे सांगण्यात येत आहे. हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा आहे.

हे सुद्धा वाचा

याबाबत पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सातार रोडवर तपासणी सुरु होती. त्यावेळी टेम्पोमध्ये दागिणे असलेले पांढऱ्या पोत्यांमध्ये बॉक्स सापडले. पोलिसांनी सोने जप्त केले तसेच टेम्पो चालकाला ताब्यात घेतले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.