sharad mohol | शरद मोहोळ याला मारण्याआधी आरोपींकडून गोळीबाराचा सराव

Sharad mohol murder case | पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी पाच जानेवारी रोजी दुपारी हत्या झाली होती. या प्रकरणातील आरोपींनी शरद मोहोळ याचा खून करण्यापूर्वी गोळीबाराचा सराव केला. मुळशीत जाऊन आरोपींनी हा सराव केला. त्यानंतर संधी मिळताच शरद मोहोळ याला संपवले.

sharad mohol | शरद मोहोळ याला मारण्याआधी आरोपींकडून गोळीबाराचा सराव
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 10:50 AM

पुणे, दि. 10 जानेवारी 2024 | पुणे शहरातील गँगवार प्रकरणात शरद मोहोळ याचा खून झाला आहे. मारणे टोळी आणि मोहोळ टोळी यांच्यात ‘खून का बदला खून’ असा प्रकार सुरु आहे. मोहोळ टोळीने मारणे टोळीतील व्यक्तीला मारले. त्यानंतर मारणे टोळीने बदला घेतला. पुन्हा तेच चक्र झाले. आता शरद मोहोळ याला मारण्यासाठी आरोपी अनेक दिवसांपासून संधीच्या साधत होते. त्यासाठी आधी मोहोळ टोळीत साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याला टोळीत घुसवले. शरद मोहोळ याला मारण्यासाठी तीन पिस्तूल घेतले. हे पिस्तूल प्रकाश नावाच्या एका व्यक्तीने दिले. मग शरद मोहोळ याच्यावर अचूक गोळ्या झाडण्यासाठी मुळशीत जाऊन गोळीबाराचा सराव केला. पोलिसांच्या तपासातून हे समोर आले आहे. यामुळे शरद मोहोळ याच्या खून प्रकरणात इतर कोणती टोळी याचा तपास पोलीस करत आहे.

संदीप मोहोळ अन् पुणे गँगवार

पुणे शहराचा विकास होऊ लागला. पुणे परिसरातील जमीन खरेदी विक्री व्यवहार वाढले. मग या व्यवहारातून संघटीत गुन्हेगारी निर्माण होऊ लागली. पुण्यात खऱ्या अर्थाने 2005 साली गँगवार सुरु झाले. गँगवारमधून 2005 मध्ये मारणे टोळीतील अनिल मारणे याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्या टोळीतील रसाळचा 2006 मध्ये खून झाला. हे दोन्ही खून प्रकरणात संदीप मोहोळ याचे नाव समोर आले. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मारणे टोळीतील दोघांचे खून झाल्यामुळे मारणे टोळी शांत बसणे शक्य नव्हती. या टोळीने 4 ऑक्टोंबर 2006 रोजी संधी साधली. संदीप मोहोळ कारमधून जात असताना पौड फाटा येथे सिग्नलला त्याची गाडी थांबली होती. तेव्हा पाठीमागून येऊन हल्लेखोरांनी हातोड्याने कारच्या काचा फोडल्या. जवळून गोळ्या घालून निर्घृण खून केला. त्यावेळी संदीप मोहोळ याच्या गाडीवर चालक शरद मोहोळ होता. संदीप मोहळच्या खुनानंतर त्याने टोळीची सूत्र घेतली.

हे सुद्धा वाचा

मारणे टोळीतील किशोर मारणे याचा खून

संदीप मोहोळ यांच्या खूनप्रकरणात गणेश मारणे यालाही अटक झाली. त्यानंतर मारणे टोळीची सूत्रे किशोर मारणे याच्याकडे आली. संदीप मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मोहोळ टोळी संधी साधत होती. मग शरद मोहोळ याने किशोर मारणे यांचा खून केला. या प्रकरणात शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा झाली. तो जामिनावर बाहेर आला होता. शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवशी पाच जानेवारी 2024 रोजी त्याची हत्या झाली.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.