Pune Fraud : पुण्यात बोगस लष्कर अधिकाऱ्याला बेड्या, आर्मित नोकरीचे आमिष दाखवून घालायचा लाखोचा गंडा
आपण लष्कर अधिकारी असल्याचे भासवून आरोपी मागील अनेक दिवसांपासून लष्करात नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना ठगत होता. पठाणकोट येथील लष्करी सेवेत नोकरी देण्याचे आमिष दाखवत होता.
पुणे / अभिजीत पोते (प्रतिनिधी) : आर्मित नोकरीचे आमिष (Lure) दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या बोगस लष्कर अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजय रघुनाथ सावंत असं अटक (Arrest) केलेल्या आरोपीचं नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 4 ने ही कारवाई केली आहे. पठाणकोट येथील आर्मी बेसवर नोकरीचे आमिष दाखवून मुलांना व पालकांची लाखोंची फसवणूक (Cheating) करत होता. आरोपीने आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आहे ? किती लाखांना गंडा घातला ? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर रिक्षा चालवायचा
संजय सावंत हा पुण्यातील देहू रोड येथे असणाऱ्या डिओडी डेपो येथे नोकरीला होता. दोन वर्षांपूर्वी आरोपी आपल्या सेवेतून निवृत्त देखील झाला होता. सध्या तो पुण्यातील पिंपळे गुरव येथे रिक्षा चालवत होता. आपण लष्कर अधिकारी असल्याचे भासवून आरोपी मागील अनेक दिवसांपासून लष्करात नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना ठगत होता. पठाणकोट येथील लष्करी सेवेत नोकरी देण्याचे आमिष दाखवत होता. मात्र हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.
सांगलीत शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना अटक
सांगलीत शेतकऱ्यांची फसवणूक करुन त्यांचे पैसे घेऊन पसार झालेल्या दोन द्राक्षे व्यापाऱ्यांच्या सांगलीतील विटा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून माल घेतला. त्या मालाची विक्री केली. मात्र शेतकऱ्यांना त्यांचे पैसे न देता ते सर्व पैसे घेऊन दोघेही पसार झाले. गणेश सुधाकर बारसकर आणि प्रवीण नारायण फटांगरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही मुंबई आणि पुण्यातून अटक करण्यात आली. आरोपींकडून 47 लाखांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. (Bogus Army Officer Arrested for Cheating Army Job Lure in Pune)