पत्नीकडे पैसे नाही, विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करा, मुलीला सांभाळा…, सावकारी जाचामुळे जीवन संपवण्यापूर्वी तरुणाचा सोशल मीडियावर व्हिडिओ

आपले जीवन संपवण्यापूर्वी राजू राजभर यांनी त्यांची पत्नी आणि लहान मुलीबाबत चिंता मांडली आहे. ते म्हणाले, माझ्या छोट्या मुलीला सांभाळा. माझ्या अंत्यसंस्कारासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नसल्याने मला माझा अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीत करा, असे रिक्षा चालकाने व्हिडिओत म्हटले आहे.

पत्नीकडे पैसे नाही, विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करा, मुलीला सांभाळा..., सावकारी जाचामुळे जीवन संपवण्यापूर्वी तरुणाचा सोशल मीडियावर व्हिडिओ
क्राईम न्यूजImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 05, 2025 | 2:16 PM

Pune Crime News: पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातून धक्कादायक बातमी आली आहे. सावकारी जाचामुळे एका रिक्षाचालक तरुणाने आपले जीवन संपवले. त्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ तयार केला. त्यावर भावनिक आवाहन करताना घरातील परिस्थिती आणि सावकाराकडून होणारा त्रास मांडला. त्यानंतर गळफास घेत त्या तरुणाने आपले लाखमोलोचे जीवन संपवले. राजू राजभर असे त्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी रजनी सिंग, राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार सावकराकडून त्रास होत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात निगडी पोलिसांनी रजनी सिंग, राजीव कुमार,महादेव फुले आणि हनुमंत गुंडे या चार आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी राजू कुमार आणि रजनी सिंग या दोघांना अटक केली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.

काय म्हटले त्या व्हिडिओमध्ये

राजू राजभर यांनी म्हटले की, मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आपले जीवन संपवण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा, असे भावनिक आवाहन करत राजू नारायण राजभर या तरुणाने चिंचवड येथील साईनगर भागातील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

या लोकांची दिली नावे

राजू राजभर यांनी रजनी सिंग, राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार बेकायदेशीर सावकाराची नावे दिली आहे. त्यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, असा व्हिडिओ तयार करत आणि सुसाईड नोट लिहित राजू राजभर या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

हे सुद्धा वाचा

माझ्या मुलीला सांभाळा

आपले जीवन संपवण्यापूर्वी राजू राजभर यांनी त्यांची पत्नी आणि लहान मुलीबाबत चिंता मांडली आहे. ते म्हणाले, माझ्या छोट्या मुलीला सांभाळा. माझ्या अंत्यसंस्कारासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नसल्याने मला माझा अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीत करा.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.