Pune News : दोन्ही दहशतवाद्यांचा राज्यात बॉम्बस्फोट करण्याचा होता कट

Pune Crime News : पुणे शहरात अटक केलेल्या दोन दहशवाद्यासंदर्भात मोठी माहिती समोर आला. या दोघांनी राज्यात बॉम्बस्फोट करण्याचा कट आखला होता. त्यासाठी त्यांनी ट्रॉयल केले होते, अशी माहिती समोर आली आहे.

Pune News : दोन्ही दहशतवाद्यांचा राज्यात बॉम्बस्फोट करण्याचा होता कट
पुणे दहशतवादी
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 3:57 PM

योगेश बोरसे, पुणे | 28 जुलै 2023 : पुणे शहरात राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी छापा टाकला. या छाप्यात मोठी कारवाई करत एका डॉक्टरास अटक केली आहे. डॉ.अदनान अली सरकारला याला एनआयएने अटक केली आहे. त्याचवेळी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघांनी राज्यात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता, अशी माहिती एटीएस सूत्रांनी दिली. या दोघांचा तिसरा साथीदार फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे.

काय होता कट

पुणे पोलिसांनी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोन जणांना अटक केली होती. एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा शोध घेताना हे दोघे सापडले होते. त्यांची चौकशी केल्यावर ते एनआयएच्या यादीतील मोस्ट वॉटेंड दहशतवादी निघाले. त्यांना १८ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्यात आला. या दोघांकडून जप्त केलेली पावडर हे स्फोटके असल्याचे स्पष्ट झाले. तसेच या दहशतवाद्यांनी पुणे, साताराच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती, ही स्पष्ट झाले. राज्यात घातपात घडवण्यापूर्वीची ही ट्रायल होती.

तिसऱ्या व्यक्तीचा शोध

दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या चौकशीचा 436 पानांचा अहवाल कोर्टात सादर केला आहे. त्यात या लोकांनी पुणे, साताराच्या जंगलात केलेल्या स्फोटाची माहिती आहे. या प्रकरणात तिसरा अमीर अब्दुल आणि महम्मद युनूस साकी यांचासोबत असलेला तिसरा आरोपी शहानवाज आलम फरार झाला. त्याचा फोटो एटीएसने जारी केला आहे. त्याचा शोध सुरू आहे. परंतु तो फरार आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक गुन्ह्यातील आरोपी

शहानवाज आलम हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. त्याने युसूफ खान आणि याकूब साकी यांना मदत केली होती. आलम फरार झाला आहे. एटीएसकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. परंतु अद्याप तो मिळाला नाही. यामुळे त्याचा फोटो जारी केला गेला आहे. ही तिन्ही आरोपी iSIS ची सहयोगी संघटना सुफाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात त्यांना घर देणाऱ्या अब्दुल पठाण यालाही एटीएसने अटक केली आहे.

हे ही वाचा

पुणे शहरात अटक केलेल्या ‘त्या’ दहशतवाद्यांची पार्श्‍वभूमी माहिती असताना घर दिले, एटीएसने केली अटक

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.