Pune crime | हिणकस कृत्य; मुलाला व नवऱ्याला जीवेमारून टाकण्याची धमकी देत नगरसेवकाच्या मुलाने भाजी विक्रेत्या महिलेवर केला बलात्कार
निवडणुकीच्या तोंडावर बदनाम करण्याच्या हेतूने हे कृत्य करण्यात आले आहे. माझ्या मुलावर केलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही असे नगरसेवक बंडू गायकवाड यांनी म्हटले आहे.
पुणे – शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक बंडू गायकवाड मुलगा समीर गायकवाडने भाजी विक्रेत्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे. मात्र नगरसेवक बंडू गायकवाड यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय कुरघोडीतून बदनाम करण्याच्या हेतूने हे आरोप करण्यात आले आहेत.
अशी आली घटना उघडकीस आरोपी समीर गायकवाड हे पीडित महिलेकडे भाजी घेण्यासाठी जात असत. यातूनच त्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर साधारण दीडवर्षांपूर्वी पीडित महिला एकटी बघून आरोपीने पीडित महिलेवर अत्याचार केला या. इतकच नव्हे तर याबाबा कुठेही वाच्यात केल्यास तुझ्या मुलाला व नवऱ्याला अमारून टाकण्याची धमकीही आरोपीने दिली. घाबरलेल्या महिलेने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. त्यानंतर17डिसेंबर रोजी पुन्हा पीडित महिलेवर अत्याचार करत असताना पीडित महिलेच्या नवऱ्याने व मुलाने आरोपीला पकडले. त्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत त्यांनाही गप्प रहा नाहीतर तुम्हाला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. यानंतर पीडित महिलेने आरोपी समीर गायकवाडच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार मुंढवा पोलिसात दिली आहे.
महिलेने खंडणी मागितल्याचा आरोप निवडणुकीच्या तोंडावर बदनाम करण्याच्या हेतूने हे कृत्य करण्यात आले आहे. माझ्या मुलावर केलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही असे नगरसेवक बंडू गायकवाड यांनी म्हटले आहे. संबंधित महिलेच्या सासूने आमच्याकडे 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. याविषयी आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे . निश्चित न्याय मिळेल, अअसेही ते म्हणाले आहेत.
Video| नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस; 3 वाजता हजर राहण्याचे आदेश
Untimely Rain : भाजीपाला पाण्यात अन् तुरीच्या शेंगा चिखलात, वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान
Corona | कपूर परिवारावर कोरोनाचा कहर! अर्जुन, अंशुला, रियासह करण बुलानीला कोरोनाची लागण