Pune Crime| कोट्यावधीच्या वक्फ जमीन मोबदला गैरव्यवहार प्रकरण ; न्यायालयाचा आरोपींना दिलासा नाहीच

आरोपींनी सुमारे 9 कोटी 64 लाख रुपये मोबदला मिळणार असलेल्या वक्फ संस्थेचे ट्रस्टी असल्याचे खोटे सांगितले. त्यासाठी पुरावा म्हणून वक्फ मंडळाचे बनावट ना हरकत पत्र सादर केले. या खोट्या माहितीच्या आधारे सुमारे 8 कोटींपेक्षा अधिक रक्कम परस्पर हस्तांतरित केली .

Pune Crime|  कोट्यावधीच्या वक्फ जमीन मोबदला गैरव्यवहार प्रकरण ; न्यायालयाचा आरोपींना दिलासा नाहीच
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 4:50 PM

पुणे- हिंजवडी माण येथील राजीव गांधी इन्फोटेक साठी अधिग्रहण करण्यात आलेल्या जमीनीच्या मोबदला प्रकरणातील गैरव्यवहारातील आरोपी साहिल मुन्ना खान तसेच रेहाना इशराक खान आणि उझेर इशराक खान यांचे अटकपूर्व जामीन अर्ज पुणे येथील सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.

ट्रस्टी सांगून बळकावली जमीन आरोपींनी सुमारे 9 कोटी 64 लाख रुपये मोबदला मिळणार असलेल्या वक्फ संस्थेचे ट्रस्टी असल्याचे खोटे सांगितले. त्यासाठी पुरावा म्हणून वक्फ मंडळाचे बनावट ना हरकत पत्र सादर केले. या खोट्या माहितीच्या आधारे सुमारे 8 कोटींपेक्षा अधिक रक्कम परस्पर हस्तांतरित केली . याप्रकरणी इम्तियाज शेख तसेच चांद मुलाणी तसेच इतर आठ आरोपींवर गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. याप्रकरणात साहील मुन्ना खान तसेच रेहाना इशराक खान आणि उझेर इशराक खान यांच्यावर आरोपपत्र दाखल झालेले असल्याने , सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा असा प्रयत्न करत होते.

न्यायालयाने त्याचे म्हणणे फेटाळून लावत सरकारी वकील ऍड. गेहलोत व मूळ फिर्यादी असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे विशेष वकील ऍड. समीर शेख यांचे म्हणणे मान्य करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आरोपपत्र कायद्यातील तरतुदीनुसार मुदतीत दाखल केले गेले असले तरी या प्रकरणाचा तपास सुरूच राहील व सखोल तपास झाला पाहिजे असे देखील न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

पोलिसांचे कौतुक

या फसवणुकीतील सुमारे 90 टक्के पेक्षा जास्त रक्कम बंडगार्डन पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक व सध्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी व त्यांच्या टीममधील अधिकारी व पोलिसांनी आतापर्यंत वसुल केली आहे. वसूल केलेली रक्कम बँकेत जमा केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. हे फार मोठे आणि विस्तीर्ण स्वरूपाचे प्रकरण असल्याने सक्तवसुली संचानालय देखील यावर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी ईशराक अब्दुलगनी खान याला पुणे येथील न्यायालयाने या पूर्वीच फरार घोषीत केले आहे.

Nagpur | अजनीत सलूनमध्ये सुरू होता देहव्यापार, पोलिसांनी कसा टाकला छापा?

Team india : टीम इंडिया 9 वर्षांचा दुष्काळ लवकरच संपवणार, या दिग्गजाने केली मोठी भविष्यवाणी

Kashi Vishwanath Corridor: हम आप सब काशीवासी लोगोनसे प्रणाम करत है; ज्या भाषेतून मोदी बोलले ती बोली माहीत आहे का?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.