ओटीपी मागत सायबर चोरांचा तरुणीला 1 लाख 81हजाराला गंडा

तरुणीने गूगलवरून संकेतस्थळाचा कस्टमर केअर नंबर मिळवला. पण झाले असे की हा नंबर सायबर चोरट्यांनी गूगलवर टाकलेला बनावट नंबर होता. तरुणीनं फोन करताच सायबर चोरट्यांनी तिचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर तिला फोनवर आलेला ओटीपी शेअर करण्यास सांगितले.

ओटीपी मागत सायबर चोरांचा तरुणीला 1 लाख 81हजाराला गंडा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 6:47 PM

पुणे – शहरात सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कधी ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून तर कधी लॉटरी लागल्याचे , परदेशातून गिफ्ट पाठवत असल्याचे सांगता सायबर चोरटे लोकांना गंडा घालत आहेत . सायबर फसवणुकीबाबत पोलीस प्रशासनानं सातत्याने नागरिकांना जागरूक करण्याचे कामही करत असतात. मात्र अनेकदा नागरिक यांच्याकडे दुर्लक्ष करतात व फसले जातात. सायबर गुन्ह्याची एका दिवसात दुसरी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 23 वर्षाच्या तरुणीला ओटीपी मागत तिच्या खात्यातून एका लाख ८१ हजार लंपास केल्याचे समोर आले आहे. याबाबत कोंढव्यातील एनआयबीएमपरिसरात राहणाऱ्या 23वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवली आहे.

बनावट नंबरमुळं आली गोत्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीने 3 महिन्यांपूर्वी ऑनलाईन शॉपिंग साईट वरून बूट ऑर्डर केले होते. मात्र या ऑर्डरचा कन्फर्मेशन कोड न आल्याने तरुणीने गूगलवरून संकेतस्थळाचा कस्टमर केअर नंबर मिळवला. पण झाले असे की हा नंबर सायबर चोरट्यांनी गूगलवर टाकलेला बनावट नंबर होता. तरुणीनं फोन करताच सायबर चोरट्यांनी तिचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर तिला फोनवर आलेला ओटीपी शेअर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पीडित तरुणीने ओटीपी शेअर केला. पुढे याच ओटीपीच्या आधारे सायबर चोरट्यांनी विविध व्यवहार करत तिच्या खात्यातील तब्बल1 लाख 81 हजार 61  रुपयांवर डल्ला मारला आहे. मात्र खात्यातून खात्यातून पैसे गायब होताच पीडित तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

विचारपूर्वक गूगल करा सायबर चोरटे गूगलवर मोठ्याप्रमाणात सक्रिय आहेत. विविध संकेतस्थळाचे फेक कस्टमर केअर नंबर त्यांनी तिथे दिले आहेत. नागरिकांनी या नंबरवर कॉल केल्यावर ते लोकांशी त्यासंकेतस्थळाचा प्रतिनिधी म्हणून बोलतात. त्यांच्याकडून ओटीपी मिळवत फसवणूक करतात. अशी माहिती सायबर गुन्हे शाखेतील पोलिसांनी दिले आहे.

संबंधित बातम्या

सुप्रीम कोर्ट म्हणाले, कुठे आहात?; परमबीर सिंग म्हणतात,… तर खड्ड्यातून बाहेर येईल

पुण्यात लोहगाव विमानतळावर1 डिसेंबरपासून ‘विंटर शेड्युल’ सुरु

नाना पटोले यांच्या पाठोपाठ बाळासाहेब थोरातही फडणवीसांच्या भेटीला, प्रज्ञा सातव विधान परिषदेवर बिनविरोध जाणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.