फेसबुकवरील मैत्रीला भुलली, गिफ्टच्या नावाखाली 9 लाखांचा गंडा, पुण्यात उच्चशिक्षित तरुणी सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात

सायबर क्राईमच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या घटना वाढण्याचा वेग आणि तीव्रता वाढत असला तरी नागरीक अत्यंत बेसावध आहेत. याचा प्रत्यय पुण्यातून दिसून येतोय.

फेसबुकवरील मैत्रीला भुलली, गिफ्टच्या नावाखाली 9 लाखांचा गंडा, पुण्यात उच्चशिक्षित तरुणी सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 7:02 PM

पुणे : सायबर क्राईमच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या घटना वाढण्याचा वेग आणि तीव्रता वाढत असला तरी नागरीक अत्यंत बेसावध आहेत. याचा प्रत्यय पुण्यातून दिसून येतोय. कारण उच्च शिक्षित, आयटी क्षेत्रात काम करणारे तरुण या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. त्यामुळे वेळीच सावध होणं जास्त आवश्यक आहे. विशेष म्हणजे सायबर पोलिसांकडून वारंवार याबाबत सावध राहण्याचं आवाहन करण्यात आल्यानंतरही अशा घटना घडत आहेत. पुण्यात अशीच एक घटना घडली होती. या घटनेतील पीडित तरुणीला तब्बल 9 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच तरुणीला आणखी दुसऱ्या सायबर गुन्हेगाराने लाखो रुपयांनी फसवलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पिंपरी चिंचवडमध्ये आयटी क्षेत्रात काम करणारी एक उच्चशिक्षित तरुणी तब्बल दोनदा सायबर फ्रॉडमध्ये अडकली आहे. सायबर फ्रॉडचे अनेक प्रकार आजकाल पाहायला मिळत आहेत. पण एकदा फसवणूक झाली तरी त्यातून काही बोध न घेता काहीजण परत जाळ्यात अडकत फसत असल्याचं समोर येतंय. पिंपरी-चिंचवडमध्ये आयटी क्षेत्रात काम करणारी एक उच्चशिक्षित तरुणी अशीच दोनदा सायबर फ्रॉडमध्ये अडकलीय.

पहिली फसवणुकीची घटना

या पीडितेची पहिली फसवणूक फेसबूक मैत्रीद्वारे झाली. सायबर गुन्हेगाराने मैत्री झाल्यानंतर पीडितेला महागडे गिफ्ट पाठवल्याचे सांगत कस्टममध्ये पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर स्वतः आलोय आणि पोलिसांनी पकडलंय असं सांगत पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. त्यामध्ये या महिलेला किमान 9 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला.

दुसरी फसवणुकीची घटना

विशेष म्हणजे सायबर गुन्हेगाराने एकदा फसवणूक करुन 9 लाख रुपयांची फसवणूक केल्यानंतरही पीडित तरुणी सावध झाली नाही. या तरुणीला दुसऱ्या एका सायबर गुन्हेगाराने कर्ज देण्याच्या नावाने फसवलं. आरोपीने कर्ज देतो सांगत या तरुणीला लाखो रुपयांनी गंडा घातला. विशेष म्हणजे सायबर गुन्हेरागाने कधी प्रोसेसिंग फी, डोकमेंटशन फी नावाने टप्प्याने पैसे उकळले ज्याची रक्कम लाखोंच्या घरात आहे. या प्रकरणी सायबर सेल तपास करत आहेत.

सावध राहा

सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या किंवा सायबर गुन्हेगारीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेष म्हणजे वृद्धांना या प्रकरणात जास्त टार्गेट केलं जात असल्याचं समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी नागपुरातून अशा अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यावेळी सायबर पोलिसांनी कारवाई देखील केली होती. तसेच पोलिसांकडून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतरही महाराष्ट्रात अशा घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध होणं जास्त आवश्यक आहे. नागरिक याबाबत सावध राहिले तर सायबर गुन्हेगारांना लुबाडण्याची संधीच मिळणार नाही.

हेही वाचा :

पंधरा-वीस दिवस फरार राहिला, अखेर पहाटे पोलिसांनी घेरलं, आता कोर्टाकडून के पी गोसावीला आठ दिवसांची पोलीस कोठडी

पंधरा-वीस दिवस फरार राहिला, अखेर पहाटे पोलिसांनी घेरलं, आता कोर्टाकडून के पी गोसावीला आठ दिवसांची पोलीस कोठडी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.