पोलीस निरीक्षकाचे फेसबुक अकाउंट हॅक करत सायबर चोरट्यांनी कशी केली फसवणूक

Pune Crime News : पुणे शहरात फसवणुकीचे अनेक प्रकार घडतात. यामध्ये उच्च शिक्षितांची फसवणूक होते. परंतु आता सायबर भामट्यांनी एका पोलीस निरीक्षकाचे फेसबुक खाते हॅक करत फसवणूक केली आहे.

पोलीस निरीक्षकाचे फेसबुक अकाउंट हॅक करत सायबर चोरट्यांनी कशी केली फसवणूक
हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेला जिवंत जाळले
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 9:34 AM

पुणे | 28 जुलै 2023 : पुणे शहरात फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. पुणे सायबर पोलिसांकडे अनेक फसवणुकीच्या तक्रारी येतात. ऑनलाइन फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे त्यावरुन दिसून येत आहे. ऑनलाईन असणारे सायबर चोरटे नवीन नवीन शक्कल लढवून फसवणूक करत आहेत. सायबर भामट्यांनी अनेकांची आयुष्यभराची कमाई लंबवली आहे. आता या भामट्यांनी एका पोलीस निरीक्षकाचे फेसबुक अकाउंट हॅक केले. त्यानंतर फसवणूक केली.

काय घडला प्रकार

पुणे येथील पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी (रा. खराडी) यांचे फेसबुक मेसेंजर हॅक करुन सायबर चोरट्यांनी फसवणूक केली. हे खाते हॅक केल्यानंतर त्यांचे नातेवाईक असणाऱ्या स्वागत नवनाथ गोसावी (वय ३६, रा. हडपसर) यांना मेसेज पाठवला. गोसावी यांना हा मेसज गिरीगोसावी करत असल्याचे वाटले. त्या व्यक्तीने गोसावी यांनी दिलेल्या क्रमांकावर फोन करण्यास सांगितले. त्या क्रमांकावरुन फर्निचरचे फोटो पाठवले. त्यानंतर या फर्निचरसाठी तत्काळ पैसे पाठविण्यास भाग पाडले. एकूण ६९ हजार ९९९ रुपयांची ही फसवणूक केली.

आता पोलीस निरीक्षकाचा वापर

आतापर्यंत सायबर भामटे सर्वसामान्यांची फसवणूक करत होते. परंतु आता त्यांनी अधिकाऱ्यांना आणि पोलिसांनाही लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे फेसबुक अकाउंट तीन ते चार वेळा हॅक केले गेले. या प्रकरणी त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आता नवनाथ गोसावी यांनी हडपसर पोलिसात तक्रार दिली आहे. त्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप शिवले करत आहेत.

हे सुद्धा वाचा

सायबर चोरट्यांनी पोलीस निरीक्षकाचे अकाउंट हॅक केल्यामुळे त्यांना कोणाची भीती नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात तरी पोलिस त्या भामट्यापर्यंत पोहचणार का? हा प्रश्न आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.