वाहतूक पोलिसांना वापरला ‘हा’ अपशब्द, त्यानंतर जे झालं…

रिक्षा चालकाच्या रिक्षाला सकाळच्या सुमारास पिंपरीमधील क्रोमा शोरूम समोर नो पार्किंगचा दंड ठोठावण्यात आला होता.

वाहतूक पोलिसांना वापरला 'हा' अपशब्द, त्यानंतर जे झालं...
नशेंडीकडून दाम्पत्याला मारहाणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 9:35 PM

पिंपरी-चिंचवड / रणजित जाधव (प्रतिनिधी) : रिक्षा चलाकाला नो पार्किंगचा ऑनलाईन दंड आकारला म्हणून एका रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घातली. नंतर हा वाद टोकाला गेल्याने रिक्षा चालक (Auto Driver) आणि वाहतूक पोलिसा (Traffic Police)त जोरदार फ्री स्टाईल हाणामारी (Fighting) झाली. पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पमध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर पोलीस हवालदार आणि संबंधित रिक्षा चालक पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाले.

पिंपरी कॅम्प परिसरात कर्तव्य बजावत होते पोलीस हवालदार

सायंकाळच्या सुमारास पिंपरी वाहतूक विभागचे पोलीस हवालदार ऋषिकेश पाटील हे पिंपरी कॅम्प परिसरात आपले कर्तव्य बजावत होते. नो पार्किंगमधील वाहनाना दंड करण्याचं आणि ती वाहनं टोइंग करत संबंधित वाहने पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचं कर्तव्य पाटील बजावत होते.

रिक्षा चालकाला नो पार्किंगचा दंड ठोठावला होता

यावेळी एक रिक्षा चालक आला आणि पोलीस हवालदार ऋषिकेश पाटील यांच्यासोबत हुज्जत घालू लागला. रिक्षा चालकाच्या रिक्षाला सकाळच्या सुमारास पिंपरीमधील क्रोमा शोरूम समोर नो पार्किंगचा दंड ठोठावण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

पोलिसांबाबत अपशब्द काढल्याने हाणामारी

दंड लागल्याचा राग मनात धरून रिक्षा चालक पोलीस हवालदार पाटील यांच्यासोबत हुज्जत घालू लागला. त्याचवेळी रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसांना उद्देशून अपशब्द काढले. “तुम्ही अशा पद्धतीने दंड करता म्हणून तुमचा मृत्यू होतो” असे बोलताच ह्या हुज्जतीचं रूपांतर हाणामारीत झालं.

रिक्षा चालक मद्यधुंद अवस्थेत

दोघांचीही त्याठिकाणी फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. संबंधित रिक्षा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. अगदी क्षुल्लक कारणावरून पोलिसांनी भर रस्त्यात मारहाण करत कायदा हातात घेतल्याने सवाल उपस्थित केला जातोय.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.