Pune Porsche Accident : लाच मागणे, फसवणूक करणे…डॉक्टर अजय तावरेवर यापूर्वी अनेक आरोप
Pune Porsche Accident : पोलिसांनी कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात आरोपींचे दोन सॅम्पल घेतले होते. ससून रुग्णालयाप्रमाणे औंधच्या रुग्णालयात सॅम्पल दिले होते. ते सॅम्पल त्याच्या वडिलांच्या सॅम्पलशी मॅच झाली. परंतु ससूनमधील हॉस्पिटलमधील सॅम्पल मॅच झाले नाही.
पुणे शहरातील बड्या बिल्डरच्या मुलाने केलेले “हिट अँड रन” प्रकरण संवेदनशील बनले आहे. या प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल त्याचे अजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना या प्रकरणात अटक झाली आहे. या बड्या लोकांनी सर्वात आधी पोलीसांवर दबाव आणून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर चालकाला धमकवणे, डांबून ठेवणे असे प्रकार केले. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट मॅनेज करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक झाली आहे. परंतु डॉक्टर तावरे आणि वाद हा विषय नेहमीच चर्चेत राहिला आहे.
कल्याणी नगर अपघात प्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. अजय तावरे यांचे नाव आधी देखील अनेक प्रकरणात चर्चेत आले होते. डॉक्टर अजय तावरे आणि वाद हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. अजय तावरे यांच्यावर यापूर्वी देखील तीन प्रकरणात कारवाई झाली होती.
या तीन प्रकरणात तावरेंवर कारवाई
किडनी फसवणूक प्रकरणात डॉक्टर अजय तावरे यांच्यावर कारवाई झाली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी उंदीर प्रकरण चर्चेत आले. ससूनमधील एका रुग्णाचा उंदीर चावून मृत्यू झाला. या प्रकरणात रुग्ण दगावल्यामुळे अजय तावरे यांचा पदभार काढून घेतला होता. त्यानंतर डॉक्टर अजय तावरे याने पोस्टमार्टम रिपोर्टच्या अहवालासाठी चक्क पोलिसांकडेच लाच मागितली होती.
ब्लड सॅम्पल प्रकरण असे झाले उघड
पोलिसांनी कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणात आरोपींचे दोन सॅम्पल घेतले होते. ससून रुग्णालयाप्रमाणे औंधच्या रुग्णालयात सॅम्पल दिले होते. ते सॅम्पल त्याच्या वडिलांच्या सॅम्पलशी मॅच झाली. परंतु ससूनमधील हॉस्पिटलमधील सॅम्पल मॅच झाले नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सॅम्पल बदलल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी डॉक्टराला अटक करण्यात आली. आता बदललेले सॅम्पल कोणाचे होते, त्याची ती चौकशी पोलीस करणार आहे. तसेच ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांकडे भक्कम तांत्रिक पुरावा आला आहे.