नाव लॅबोरेटरीज पण निर्मिती ड्रग्सची, पुणे शहरात आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्सचा साठा जप्त

pune drug racket | पुणे शहरात काही महिन्यांपूर्वी ड्रग्स तस्कर ललित पाटील त्याचा भाऊ भूषण पाटील आणि इतर आरोपींना अटक झाली होती. या लोकांनी नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखानाच उघडला होता. आता पुणे शहरात ड्रग्सचा कारखाना मिळाला आहे.

नाव लॅबोरेटरीज पण निर्मिती ड्रग्सची, पुणे शहरात आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्सचा साठा जप्त
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 9:34 AM

अभिजित पोते, पुणे, दि. 20 फेब्रुवारी 2024 | पुणे सांस्कृतिक शहर म्हणून जगभर ओळखले जाते. परंतु आता पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. ड्रग्सची तस्करी होत आहे. खुलेआम ड्रग्सची विक्री होत आहे. आता पुणे शहरात ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे शहरात आतापर्यंतचे सर्वात मोठे ड्रग्स पकडले गेले आहे. पुणे शहरात 1100 कोटी रुपये किमतीचे 600 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात सोमवारी दोन गोडावूनची झडती घेऊन 55 किलो ड्रग्स जप्त केले होते. त्यानंतर मंगळवारी कुरकुंभमध्ये एका केमिकल कंपनीमध्ये 550 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. अजून या ड्रग्सचा साठा मिळण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

1100 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, साबळे नावाच्या व्यक्तीचा हा कारखाना आहे. या ठिकाणावरुन ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणात देशभरात अनेक शहरात आज धाडी टाकण्यात येत आहेत. यामुळे अजून मोठ्या प्रमाणात ड्रग्सची जप्ती होऊ शकते.

कुठे मिळाला कारखाना

पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये ड्रग्ज रॅकेट उघड झाले आहे. कुरकुंभ येथील एका केमिकल कारखान्यात ड्रग्सची निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी खातरजमा करुन कुरकुंभ एमआयडीसी मधील अर्थकेम लॅबोरेटरीज कंपनीवर टाकला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या या प्रकारात ड्रग्सचा मोठा साठा मिळाला. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

राजकीय संबंध नाही

ड्रग्स रॅकेट प्रकरणात कोणतेही राजकीय कनेक्शन नाही. या प्रकरणात सोमवारी तीन जणांना अटक करण्यात आली होती. पुण्यातून देशातील विविध शहरांमध्ये ड्रग्स पुरवल जात असल्याची माहिती चौकशीतून समोर आली. वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख या तिघांना अटक केली होती. त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाले. वैभन माने आणि हैदर शेख हे वर्षभरापूर्वी येरवडा कारागृहात होते. कारागृहातून बाहेर आल्यानंतर या दोघांनी ड्रग्सची विक्री करण्यास सुरुवात केली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.