पुण्यात FC रोडवर नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री? रवींद्र धंगेकर यांचा पुणे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप

पुण्याच्या शिवजीनगर भागातील एफसी सोडवर असणाऱ्या एका नामांकीत हॉटेलमध्ये काल मध्यरात्री अल्पवयीन मुलं सर्रासपणे ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारावर आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत.

पुण्यात FC रोडवर नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री? रवींद्र धंगेकर यांचा पुणे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप
पुण्यात FC रोडवर नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री?
Follow us
| Updated on: Jun 23, 2024 | 5:06 PM

पुण्यात FC रोडवर नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत आहे का? असा प्रश्न आता निर्माण होतोय. शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्टीत ड्रग्ज पुरवलं गेलं का? अनेक अल्पवयीन मुलांना दारु दिल्याचादेखील संशय आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर आणखी एक प्रकार आता समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात कल्याणीनगर येथील अपघाताचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यातील एका नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्ज घेतल्याचा प्रकार समोर येत आहे. पुण्याच्या शिवजीनगर भागातील एफसी सोडवर असणाऱ्या एका नामांकीत हॉटेलमध्ये काल मध्यरात्री अल्पवयीन मुलं सर्रासपणे ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारावर आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली. धंगेकर यांनी या मुद्द्यावरुन पोलीस, उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.

रवींद्र धंगेकर काय म्हणाले?

“या प्रकरणामध्ये पूर्णपणे पोलिसांची चूक आहे. अंमली पदार्थ सर्रासपणे मिळतोय. तसेच असे अंमली पदार्थ अशा हजारो हॉटेलमध्ये मिळत आहेत. हुक्का पार्लरच्या नावाखाली पुणे शहरात असे प्रचंड प्रमाणात अंमली पदार्थ मिळतात. यामध्ये पोलिसांची चूकच आहे. अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. हप्ता बंद झाला. पैसे घेतल्यामुळे असे धंदे चालतात. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे रजपूत सारख्या अधिकाऱ्याला पाठिशी घालून, ज्यांच्याकडून कोट्यवधी रुपये हे शंभूराजे देसाई घेतात, हे धंदे चालतात”, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.

“आम्ही एवढं मोठं आंदोलन करुन सुद्धा संबंधित अधिकाऱ्याची बदली सुद्धा झाली नाही. याचा अर्थ असा आहे की, शंभूराज देसाई या अधिकाऱ्यांना पाठिशी घालतात. हे खोके सरकार पाठिशी घालतात. हा पैसा राजकारणात वापरण्यासाठी आमच्या तरुणाईला बरबाद करण्याचं काम हे लोकं करतात. त्यामुळे ही सर्व चूक पोलीस आणि त्या खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांची आहे”, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.

‘कुठल्या हॉटेमधून किती पैसे जातात याची माझ्याकडे यादी’

“मी तुम्हाला यादी देऊ शकतो की, कुठल्या हॉटेमधून किती पैसे जातात, माझ्याकडे यादी आहे. माझ्याकडे रात्रीच यादी आली. त्या यादीत प्रचंड प्रमाणातील पैसे हप्तेच्या स्वरुपात पोलिसांना मिळतात. त्यांच्याच पुण्यायीने असे अंमली पदार्थ विकले जातात. पुणे पोलिसांची एवढी बदनामी होतेय तरी पैशांच्या लोभापाई ही लोकं गप्प बसतात”, अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली.

“ज्या हॉटेलमध्ये हे सर्व चालत असेल त्यांना कायम स्वरुपी सेल लावली पाहिजेत आणि बंद केली पाहिजेत. आता हॉटेल चालकांना भीती राहिीलेलील नाही. अजूनही पहाटे चार वाजेपर्यंत बार चालतात. अजूनही ही कीड संपलेली नाही. निव्वळ पैसे, हप्ता यांच्या नादात पुण्याचं नाव बरबाद करण्याचं काम ही मंडळी करत आहेत. आम्ही रस्त्यावर उतरुन या लोकांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या अधिवेशानत या विषयावर आम्ही बोलणार”, अशी भूमिका रवींद्र धंगेकर यांनी मांडली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.