Pune Suicide : घरातील आर्थिक अडचणीमुळे पुण्यात वृद्धाची आत्महत्या, धायरी परिसरातील घटना

| Updated on: Jul 24, 2022 | 8:37 PM

पुण्यातील धायरी फाटा जवळील सणस शाळेजवळ असणाऱ्या एका कॅनॉलमधून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यात स्थानिकांना एक मृतदेह दिसला. नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Pune Suicide : घरातील आर्थिक अडचणीमुळे पुण्यात वृद्धाची आत्महत्या, धायरी परिसरातील घटना
घरातील आर्थिक अडचणीमुळे पुण्यात वृद्धाची आत्महत्या
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे / अभिजीत पोते (प्रतिनिधी) : घरातील आर्थिक अडचणीं (Financial Problem)मुळे एका वृद्धाने कॅनॉलमध्ये उडी घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना पुण्यातील धायरी परिसरात घडली आहे. भानुदास लाळे (72) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे. लाळे हे 22 जुलैपासून बेपत्ता (Missing) होते. त्यांचा मुलगा हा सिंहगड परिसरामध्ये असलेले एक हॉटेल चालवतो अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, मयत वृद्धाच्या कुटुंबीयांचीही पोलीस चौकशी करत आहेत. चौकशीअंतीच नेमके कारण स्पष्ट होईल.

पुण्यातील धायरी फाटा जवळील सणस शाळेजवळ असणाऱ्या एका कॅनॉलमधून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यात स्थानिकांना एक मृतदेह दिसला. नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

चंद्रपूरमध्ये कर्जबाजारीपणीमुळे युवा शेतकऱ्याची आत्महत्या

सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पीक वाहून गेल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन युवा आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. अमित मोरे (22) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातील कवीठपेठ येथील शेतात अमितने दहा एकर शेतीमध्ये सोयाबीन, मिरची व कापूस पिकाची लागवड केली होती. मात्र पुराच्या पाण्यात ही पिके वाहून गेली. कर्ज व बुडीत शेतीमुळे वडिलांनी देखील एक वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. मात्र अमितने निराश न होता मोठ्या भावाच्या मदतीने शेती करून कुटुंबाला हातभार लावला होता. मात्र शेतीच वाहून गेल्यामुळे आणि डोक्यावर कर्ज असल्याने नैराश्येतून त्यानेही आज आत्महत्या केली. (Due to financial problems old man commits suicide in Pune)

हे सुद्धा वाचा