पुणे, नाशिक, कोल्हापुरात गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कंपनीची कोट्यवधींची मालमत्ता जप्त

Pune Crime News: पुणे येथील धनश्री मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीतच्या माध्यमातून विनोद खुटे याने फसवणूक केली होती. त्याने गुंतवणूकदरांना शोधून त्यांना दरमहा 2-4% उच्च व्याज देण्याचे आमिष दाखवत त्यांची जमापुंजी सोसायटीत गुंतवली. त्यानंतर ही रक्कम हवाला चॅनेल आणि शेल कंपन्यांद्वारे देशाबाहेर पाठवली होती.

पुणे, नाशिक, कोल्हापुरात गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कंपनीची कोट्यवधींची मालमत्ता जप्त
विनोद कुटे दुबईत फरार झाला आहे.
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 7:39 AM

पुणे, नाशिक, कोल्हापूर शहरातील गुंतवणूकदरांची १०० कोटींत फसवणूक करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. पुणे येथील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची पाच कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. ईडीने कंपनीच्या पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील कार्यालयात छापे मारले आहे. या कारवाईत मुदत ठेवीच्या पावत्या, दागिने जप्त करण्यात आले आहे. मार्च महिन्यात ईडीने छापे टाकून २४ कोटी ४१ लाखांची मालमत्ता जप्त केली होती.

शंभर कोटींचे फसवणूक प्रकरण

व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजकडून अनधिकृत मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजना सुरु करण्यात आली होती. जास्त परताव्याचे आमिष दाखवून कंपनीने गुंतवणूकदारांची शंभर कोटीत फसवणूक केली होती. या प्रक्ररणात व्हीआपीएस कंपनीचे संचालक विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे (रा.आंबेगाव, पुणे) किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडघे यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विनोद खुटे आणि त्याचे साथीदार गुंतवणूकदारांची फसवणूक करुन पसार झाले.

आतापर्यंत ७० कोटींची मालमत्ता जप्त

शेकडो गुंतवणूकदारांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार केली. पोलिसांच्या तपासात फसवणुकीची रक्कम शंभर कोटींपेक्षा जास्त होती. यानंतर या प्रकरणाचा तपास ईडीकडे गेला. ईडीने या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ईडीने गेल्या वर्षी जून महिन्यात पुणे, मुंबई तसेच अहमदाबादमधील व्हीआयपीएस कंपनी तसेच ग्लोबल अॅफिलेट बिझनेस या कंपनीवर कारवाई केली होती. त्यानंतर कंपनीच्या संचालकांच्या नावावर असलेली मालमत्ता जप्त केली होती. आतापर्यंत ७० कोटी ८९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे येथील धनश्री मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीतच्या माध्यमातून विनोद खुटे याने फसवणूक केली होती. त्याने गुंतवणूकदरांना शोधून त्यांना दरमहा 2-4% उच्च व्याज देण्याचे आमिष दाखवत त्यांची जमापुंजी सोसायटीत गुंतवली. त्यानंतर ही रक्कम हवाला चॅनेल आणि शेल कंपन्यांद्वारे देशाबाहेर पाठवली होती. विनोद कुटे दुबईत फरार झाला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.