Pune Blast : पुण्यातील भवानी पेठमध्ये वॉशिंग मशिनमध्ये स्फोट, नागरिकांनी न घाबण्याचे पोलिसांचे आवाहन

ज्या फ्लॅटमध्ये हा ब्लास्ट झाला, त्या ठिकाणी पोलीस एका व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. फ्लॅटमध्ये झालेला स्फोट इतका भीषण होता की, या ब्लास्टचा आवाज संपूर्ण सोसायटीमध्ये ऐकायला गेला. त्यानंतर सोसायटीमध्ये रहिवाशांनी लागलीच पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन राशद शेख या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Pune Blast : पुण्यातील भवानी पेठमध्ये वॉशिंग मशिनमध्ये स्फोट, नागरिकांनी न घाबण्याचे पोलिसांचे आवाहन
पुण्यातील भवानी पेठमध्ये वॉशिंग मशिनमध्ये स्फोटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 10:31 PM

पुणे : भवानी पेठमधील विशाल सोसायटीमध्ये एका वॉशिंग मशिनमध्ये स्फोट (Blast) झाल्याची घटना घडली आहे. विशाल सोसायटीच्या बी विंग बिल्डींगमधील तिसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला आहे. घटनेचे गांभीर्य पाहून भवानी पेठमधील विशाल सोसायटीमध्ये पुणे पोलीस (Pune Police) दलातील वरिष्ठ अधिकारी दाखल तसेच बीडीडीएस टीम (BDDS Team) दाखल झाल्या. ज्या फ्लॅटमध्ये हा ब्लास्ट झाला, त्या ठिकाणी पोलीस एका व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. फ्लॅटमध्ये झालेला स्फोट इतका भीषण होता की, या ब्लास्टचा आवाज संपूर्ण सोसायटीमध्ये ऐकायला गेला. त्यानंतर सोसायटीमध्ये रहिवाशांनी लागलीच पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन राशद शेख या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

नागरिकांनी घाबरु नये असे पोलिसांचे आवाहन

पुण्यातील भवानी पेठ येथील विशाल सोसायटी येथे दुपारी 3 वाजता राशिद शेख यांच्या विशाल अपार्टमेंट येथील बी विंग मधील तिसऱ्या मजल्यावरील 306 फ्लॅटमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटमध्ये त्या फ्लॅटमधील सर्व काचा तुटल्या आहेत. दुपारी 3 वाजता जेव्हा हा स्फोट झाल्यानंतर पुणे शहरातील सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. हा व्यक्ती इलेक्ट्रिकल मेकॅनिक आहे. तो गेल्या 10 वर्षापासून या सोसायटीत राहत आहे. दररोज दुपारी 12 वाजता तो यायचा आणि संध्याकाळपर्यंत याच ठिकाणी थांबायचा. त्यानंतर परत तो त्यांच्या बहिणीकडे जायचा. तो एकटाच इथे गेल्या 10 वर्षापासून राहत असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन मुश्ताक अहमद याने दिली. तपासणी दरम्यान वॉशिंग मशिनमधील गॅसचा ब्लो टॉर्च गॅसचा जास्तीचा फ्लो आल्याने स्फोट झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या संशयित प्रकार नाही नागरिकांनी घाबरून जाऊ नये आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे. (Explosion in washing machine in Bhavani Peth, Pune, appeal to the police not to frighten the citizens)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.