पुणे : पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारी कमी होत नाही. पोलिसांच्या कारवाईनंतरही कोयता गँगचा धुमाकुळ सुरु आहे. त्यातच आत्महत्यांच्या (Suicide) घटनांमध्ये वाढ होत आहे. पुणेजवळील पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad)आत्महत्येच्या घटनेमुळे परिसर हादरला आहे. बापाने पोटच्या १६ वर्षीय मुलाला ११२ व्या मजल्यावरुन खाली फेकून दिले. त्यानंतर स्वत: उडी घेऊन आत्महत्या केली.आदेश क्रांती तावडे (वय १६), क्रांती तावडे (वय ४४) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
का केली आत्महत्या
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वाकडमधील एका सोसायटीत राहणारे क्रांती यांनी आदेशला आधी बाराव्या मजल्यावरुन खाली फेकले. यानंतर स्वत: उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेची माहिती माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
पोलिसांनी तपास केला असता दोन्ही मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली. व्यवसाय व नोकरीतील अडचणी, एकटेपणाची जाणीव यासारख्या कारणांमुळे आत्महत्येच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे.
का करतात आत्महत्या
अत्याधिक तणाव, नकार मिळणे, अपयश मिळण, ब्रेकअप होणे, शाळेतील त्रास, कुटुंबातील समस्या, करिअरची चिंता, मेंटल डिसऑर्डर यासारख्या अनेक कारणांचा समावेश असू शकतो.
‘ही’ लक्षणे दिसल्यास व्हा सावध