Pimpri-chinchawad crime |शहरात पिस्तुल परवान्यांसाठी ‘भाऊ’ , ‘दादा’, ‘मामांची चढाओढ
आवश्यक ते सर्व नियम व अटी पूर्ण होत आहेत का? या सगळ्याचा विचार करूनच पिस्तूल परवाना दिला जात आहे. मात्र पोलीस आयुक्तालयाकडून परवानगी नाकारल्यानंतर काहीजण नाकारलेली फाईल घेऊन मंत्रालय गाठत आहेत. मंत्र्याच्या मार्फत आतापर्यंत 26 जणांना पिस्तुलाचे परावणारे मिळाले आहेत. त्यातील 13 जण हे हिंजवडी हद्दीतील आहेत.
पुणे – पिंपरी-चिंचवड झपाट्याने बदलत आहे. नोकरदारांसाठी महत्त्वाचे असलेले आयटी हब, उद्योगनगरीमुळे शहरातील जमींन कोट्यवधी रुपयांच्या भाव आले आहेत. यातून साहजिकच आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत देवांना घेवाण वाढली आहे. यातूनच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढीस लागले आहे. गुन्हेगारीमुळे अलीकडच्या काळात स्वसंरक्षणाच्या नावाखाली पिस्तुल परवान्याच्या मागणीत वाढ होत आहे. स्वतःला असुरक्षित समजाणाऱ्यांमध्ये राजकीय नेते, बांधकाम व्यवसायिक , उद्योजक,डॉक्टर, गुन्हयातील साक्षीदार यासारख्या लोकांचा समावेश आहे.आतापर्यंत पिंपरी – चिंचवड आयुक्तालयाच्या हददीत 1 हजार 75 जणांना परवाना दिला आहे.
परवान्यासाठी घेताय मंत्रालयाची मदत पोलीस आयुक्तालय स्तरावर अनेक लोकांना पिस्तूल परवाना मिळत नाही. पिस्तूल परवाना मागतांना नेमकी गरज काय आहे. आवश्यक ते सर्व नियम व अटी पूर्ण होत आहेत का? या सगळ्याचा विचार करूनच पिस्तूल परवाना दिला जात आहे. मात्र पोलीस आयुक्तालयाकडून परवानगी नाकारल्यानंतर काहीजण नाकारलेली फाईल घेऊन मंत्रालय गाठत आहेत. मंत्र्याच्या मार्फत आतापर्यंत 26 जणांना पिस्तुलाचे परावणारे मिळाले आहेत. त्यातील 13 जण हे हिंजवडी हद्दीतील आहेत.
असा मिळतो परवाना
शस्त्र हवे असल्यास पोलीस आयुक्तालयात अर्ज करावा लागतो. कागदपत्रे म्हणून रहिवासी पुरावा, लाईट बिल, उत्पन्नाचा दाखल , डॉक्टरांचा अहवाल गरजेचे आहे. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्याकडून अर्जदारीची चौकशी होते . यानंतर पोलीस आयुक्तालयता अर्जदाराची गरज किती आहे हे तपासली जाते.पोलिसांना प्रत्यक्ष भेटीमध्ये योग्य वाटल्यास परवाना दिला जातो.
पोलीस स्टेशनस परवानाधारक पोलिसांची संख्या
पिंपरी 88
चिंचवड 76
भोसरी 101
भोसरी एमआयडीसी 46
निगडी 104
दिघी 116
चाकण 64
आळंदी 18
वाकड 77
हिंजवडी 120
सांगवी 102,
देहूरोड- 32
तळेगाव- 84
तळेगाव एमआयडीसी – 17
चिखली 30
कधी नव्हे ते सुर्यफूलाच्या क्षेत्रात वाढ, आता वाढीव उत्पादनासाठी ‘असे’ करा व्यवस्थापन..!