Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे येथील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेच्या संस्थापकावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकार

Pune Crime News | पुणे शहरातील मोठ्या शैक्षणिक संस्थेच्या संस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे ७४ लाख रुपयांचा हा अपहार आहे.

पुणे येथील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेच्या संस्थापकावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकार
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 9:23 AM

अभिजित पोते, पुणे, दि. 29 नोव्हेंबर 2023 | पुणे शहर शैक्षणिक केंद्र आहे. देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. अनेक नामांकीत संस्था पुणे शहरात आहेत. पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमधून अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात. या संस्थेच्या संस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पुणे पोलिसांनी फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संस्थेमधील सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांचा भविष्यनिर्वाहनिधी जमा न केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 74 लाख रुपये फसवणुकीचा हा प्रकार आहे. यामुळे खळबळ उडली आहे.

काय आहे प्रकार

नवले याच्या कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलमधील भविष्य निर्वाह निधीतील हा प्रकार आहे. या शाळेतील दीडशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारातून 2019 ते 22 पर्यंत पीएफ कपात झाली. सुमारे 74 लाख रुपये कपात करण्यात आली होती. परंतु ही रक्कम पीएफ खात्यांमध्ये भरली गेली नाही. मारुती नवले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ती रक्कम वापरली. कर्मचाऱ्यांचे तब्बल 74 लाख रुपये मारुती नवले यांनी पगारातून कपात केल्यानंतर भरले नाही. कपात केलेली रक्कम मारुती नवले यांनी भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्याचे साठी वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांकडून गुन्हा दाखल

मारुती नवले यांच्यावर कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएफची रक्कम न भरणाऱ्या अनेक संस्था आणि कंपन्यांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. परंतु पुण्यातील नामांकीत शिक्षणसंस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. या प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.