किरकोळ कारणातून भांडण, दहशत माजवण्याचा प्रयत्न; पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या

1 जानेवारी रोजी काही तरुणांमध्ये आपापसात किरकोळ कारणावरून भांडण झाले. या भांडणाचा मनात राग ठेऊन या आरोपींनी नवा वाडा येथे जाऊन हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

किरकोळ कारणातून भांडण, दहशत माजवण्याचा प्रयत्न; पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या
आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबितImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 9:44 PM

पुणे : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या पाच जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेले काही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. गगन मिशन (19), अमन खान (22), अर्सालान तांबोळी (27), मंगेश चव्हाण (24), गणेश पवार (24) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुण्यात अशा घटना वारंवार घडत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

किरकोळ कारणातून तरुणांमध्ये भांडण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी काही तरुणांमध्ये आपापसात किरकोळ कारणावरून भांडण झाले. या भांडणाचा मनात राग ठेऊन या आरोपींनी नवा वाडा येथे जाऊन हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

घटना सीसीटीव्हीत कैद

दहशत माजवताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या पाचही आरोपींना अटक केली आहे. या पाच जणांपैकी काही आरोपी हे रेकॉर्ड वरचे गुन्हेगार आहेत.

हे सुद्धा वाचा

हत्यारे दाखवून दहशत माजवण्याच्या घटनांमध्ये वाढ

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात अनेक तरुण हातात कोयता घेऊन सर्रास दहशत घडवत आहेत. गेल्या काही दिवसापासून शहरातील अनेक मध्यवर्ती तसेच उपनगर भागात अनेक तरुण कोयता घेऊन फिरत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.