पुणे लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई ; वनपाल व वनरक्षकाला 1 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले

वन अधिकाऱ्या बाबत देण्यात आलेल्या तक्रारीवरुन गेल्या आठ दिवसापासून वनपाल आणि वनरक्षकच्या भोवती लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता. वनविभागाच्या शिरूर येथील कार्यालयातच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

पुणे लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई ; वनपाल व वनरक्षकाला 1 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 7:15 PM

शिरुर- वनक्षेत्रातील वाळली लाकडे नेणाऱ्यांना पकडत, कारवाई न करण्यासाठी 1 लाखांची लाच घेताना वनविभागाच्या अधिकाऱ्यासह  कर्मचाऱ्याला  लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. यावेळी पोलिसांनी तब्बल एक लाखांची रोकडीही जप्त केली आहे. वन अधिकाऱ्या बाबत देण्यात आलेल्या तक्रारीवरुन गेल्या आठ दिवसापासून वनपाल आणि वनरक्षकच्या भोवती लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता. वनविभागाच्या शिरूर येथील कार्यालयातच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत विभागाचे पोलिस उपायुक्त श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यावेळी एका लाखांच्या रक्कमेसह वनपाल आणि एक वनरक्षक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अशी केली कारवाई लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार लाकूड वाहून नेणाऱ्या दोन पिकअप गाड्या 1 नोव्हेंबर रोजी वनविभागाने पकडल्या होत्या. पिकअपच्या वाहतूकीस परवानगी नाही. त्यामुळे कारवाई पासून वाचायचे असेल तर 1 लाख रुपये दे अशी मागणी तक्रारदारकडे करण्यात आली. 1 लाख न दिसल्यास करावाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. एवढ्या मोठ्या रक्कमेची लाच देण्याची तक्रार दाराची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यानं पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार दाखल केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज लाचलुचपत विभागाने सापळा रचून वनपाल सागर भोसले (34 ) व वनरक्षक संजय भोसले (45) त्यांच्यावर कारवाई करता अटक केली आहे.

संबंधित बातम्या:

‘पवार म्हणाले मध्यममार्ग काढा, पण पवारांचा मध्यमार्ग पूर्वेला, दक्षिणेला की उत्तरेला?’ सदाभाऊ खोतांचा खोचक सवाल

कोरोनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान, ‘ब्रीज कोर्स’ची आखणी करण्याची रोहित पवार यांची मागणी

पुण्यात लोहगाव विमानतळावर1 डिसेंबरपासून ‘विंटर शेड्युल’ सुरु

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.