पुणे – मागील काही दिवसांपासून शहरात हत्यांचे सत्र सुरूच आहे. मित्राची चेष्टा मस्करी करणे दुसऱ्या मित्राच्या जीवावर बेतले आहे. चेष्टा मस्करीतून झालेल्या वादाचे पर्यवसन हत्या करण्यामध्ये झाले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी व मृत तरुण या परिसरात कचरा गोळा करण्याचे काम करायचे. या दोघांमध्ये दोन दिवसांपूर्वी एकमेकांची चेष्टा करण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आज सकाळी एस आर एम गुजराती शाळेजवळ कामाच्या ठिकाणी हे दोघे एकत्र आल्यानंतर पुन्हा त्यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी आरोपी पाटीलने मित्र अमन यादव याच्यावर चाकूने सपासप वर केले. या घटनेत अमन यादवचा जागीच मृत्यू झाला.
थेट गाठले पोलीस स्टेशन
या घटनेनंतर आरोपीने कुठेही पळून न जाता थेट पोलीस स्टेशन गाठले. फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये हजर होता आपण आपलया मित्राचा खून केल्याची कबुलीही दिली. आरोपीने दिलेल्या माहितीनंतर पोलीस स्थानकातही ही खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी तातडीने टनेची खातरजमा करण्यासाठी घटना स्थळावर धाव घेतली. तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली. घटनास्थळ दाखल झाल्यानंतर पोलिसांना त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. मृत आमानला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
१५ दिवसात ६ हत्या
गेल्या पंधरा दिवसापासून हत्यांचे सत्र सुरूच आहे. पुण्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये १५ दिवसात ६ हत्या झाल्या आहेत. यात कात्रज परिसरात १ वारजे परिसरात ३ तर फरासखाना परिसरात खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. हत्येच्या घटनांचे सत्र वाढत असताना दुसरीकडे या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे.
ST Strike | ऊन, थंडी, वारा, पावसात ST कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानात आंदोलन
Nashik| साहित्य संमेलनात उद्या होणार हे कार्यक्रम, जाणून घ्या वेळ आणि मान्यवर…!
भुपेंद्र पटेल यांचा महाराष्ट्र दौरा, महाराष्ट्रातील उद्योजकांच्या भेटीगाठी सुरू