Sharad mohol murder case | मुळशी पॅटर्न, संदीप मोहोळच्या गाडीवर चालक ते गँगस्टर शरद मोहोळचा संपूर्ण प्रवास

| Updated on: Jan 08, 2024 | 10:48 AM

Sharad mohol murder case | २०१८ साली मुळशी पॅटर्न चित्रपट आला होता. हा चित्रपट संदीप मोहोळ याच्या जीवनावर आधारित होता. त्या संदीप मोहळ याच्या गाडीवर शरद मोहोळ हा चालक होता. चालक ते गँगस्टर असा शरद मोहोळ याचा प्रवास होता.

Sharad mohol murder case  | मुळशी पॅटर्न, संदीप मोहोळच्या गाडीवर चालक ते गँगस्टर शरद मोहोळचा संपूर्ण प्रवास
मुळशी पॅटर्न चित्रपटातील संदीप मोहोळ याच्या गाडीवर शरद मोहोळ चालक होता
Follow us on

पुणे, दि. 6 जानेवारी 2024 | पुणे शहरात पुन्हा गँगवार सुरु झाले आहे. शरद मोहोळ याची शुक्रवारी दुपारी त्याच्या कार्यालयाजवळ हत्या झाली. गर्दीतून आलेल्या चौघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणात मुख्य सूत्रधार साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याचे तपासातून समोर आले आहे. शरद मोहोळ याचा प्रवास थक्क करणारा आहे. संदीप मोहोळ याच्या गाडीवर चालक ते गँगस्टर असा हा त्याचा प्रवास होता. शेवटी गँगवारमधूनच त्याची हत्या झाली. त्याची हत्येचा सूत्रधार असणारा साहिल पोळेकर सात दिवसांपूर्वीच त्याचा गँगमध्ये आला होता.

पुणे शहरात गँगवार सुरु

२००६ मध्ये मारणे गँगच्या सुधीर रसाळ याची संदीप मोहोळ याने हत्या केली होती. या हत्येनंतर पुणे शहरात गँगवार सुरु झाले. सुधीर रसाळ याच्या हत्येच्या बदला घेण्यासाठी मारणे गँगने संदीप मोहोळ याची हत्या केली. संदीप मोहोळ याची हत्याही मारणे गँगने नियोजनपूर्वक केली. संदीप मोहोळ मोटारीतून जात होते. ती मोटार बुलेटप्रूफ असल्याचे मारणे टोळीला वाटले. यामुळे पौड फाट्यावर त्यांची गाडी थांबताच गाडीचे काच फोडले. त्यानंतर संदीप मोहोळ यांच्यावर गोळ्या झाडल्या.

हे सुद्धा वाचा

शरद मोहोळ यांनी घेतला बदला

संदीप मोहोळ यांची हत्या झाली तेव्हा त्याची गाडी संदीप मोहोळ चालवत होता. ही घटना शरद मोहोळ याची गुन्हेगारी विश्वात एंन्ट्री करणारी ठरली. संदीप मोहोळ याच्या हत्येनंतर शरद मोहोळ याने गँगची सूत्रे हाती घेतली. २०१० मध्ये संदीप याच्या हत्येचा बदला घेतला. संदीप मोहोळ याची हत्या करणारा किशोर मारणे याची  हत्या शरद मोहोळ याने केली. या हत्येसाठी शरद मोहोळ याला जन्मठेपीची शिक्षा झाली. त्या प्रकरणात तो जमिनीवर सध्या होता. परंतु या खून प्रकरणानंतर पुणे हादरले आहे.