चारित्र्याच्या संशयातून पतीने काढला पत्नीचा काटा; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची हत्या केली आहे. जुन्नर तालुक्यातील तांदळवाडीमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरेश शिंदे असे आरोपीचे नाव आहे, तर संध्या शिंदे असे या मृत महिलेचे नाव आहे.

चारित्र्याच्या संशयातून पतीने काढला पत्नीचा काटा; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 8:06 PM

जयवंत शिरतर | पुणे:  चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची हत्या केली आहे. जुन्नर तालुक्यातील तांदळवाडीमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरेश शिंदे असे आरोपीचे नाव आहे, तर संध्या शिंदे असे या मृत महिलेचे नाव आहे. सुरेश शिंदे हा सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता, त्यामधून त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने संध्या यांची गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दारूच्या नशेत पत्नीची हत्या

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील नगदवाडी परीसरातील तांदळवाडीमध्ये शिंदे यांचे कुंटुब वास्तव्यास आहे. आरोपी सुरेश शिंदे हा सतत आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, यावरून त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. आरोपीला दारूचे देखील व्यसन होते. आरोपी दारू पिऊन घरी आला आणि नशेत पत्नीबरोबर वाद घातला. वाद इतका टोकाला गेला की त्याने गळा दाबून तिची हत्या केली.

आरोपीला अटक

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले, नारायणगाव पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चारित्र्याच्या संशयातून आरोपीने पत्नीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या

अंबरनाथमध्ये डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या, तर्कवितर्कांना उधाण, पोलिसांकडून चौकशीला सुरुवात

Sulli Deal : ‘सुल्ली डील’ प्रकरणाची गृहमंत्र्यांकडून तात्काळ दखल, वळसे-पाटलांचे कठोर कारवाईचे आदेश

ट्रक अपघातात कामगार गंभीर जखमी; गडचांदूर -वनोजा मार्गावर संतप्त नागरिकांचे रास्तारोको आंदोलन

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.