Pune Crime|धक्कादायक ! सतत मुलांच्या तक्रारी करणाऱ्या पत्नीचा पतीने केला खून

चिडलेल्या पतीने पत्नी आसमाला मारहाण करण्यास सुरुवात केली . लाथाबुक्क्यांनी तिला मारहाण करत तिचे डोके भिंतीवर आपटले.  त्यानंतर रात्री आसमा झोपली, मात्र सकाळ बराच वेळ झाला तरी त्या उठल्या नाहीत. त्यावेळी पती त्यांना उठवायला गेला. परंतु आसमा उठली नाही , तिचे शरीरपूर्णपणे थंड पडले होते.

Pune Crime|धक्कादायक ! सतत मुलांच्या तक्रारी करणाऱ्या पत्नीचा पतीने केला खून
crime News
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 3:47 PM

पुणे – सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या खुनाच्या घटनेने पुणे हादरले आहे. मुलांच्या सततच्या भांडणाची तक्रारीवरुन पती-पत्नीत वाद झाला. या वादातूनच पतीने पत्नीचा लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करत खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आसमा तौसिफ हवारी- शेख (वय27 ) असे मरत पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी खाक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती तौफिक नूरहंसन हवारी-शेख याला घेतलं ताब्यात घेतलं आहे.

नेमकं काय घडलं मिळालेल्या माहितीनुसार मृत आसमा हवारी- शेख तिच्या कुटुंबियांसोबत भवानी पेठेतील गुलशन बेकरीच्या मागे वास्तव्यास आहेत. आरोपी पती तौफिक हा सलूनच्या दुकानात काम करतो. या दोघांना दोन अपत्य आहेत. मुलांमध्ये होणाऱ्या भांडणाच्या तक्रारी पत्नी आसमासातत्याने पतीला सांगत असे. मुलांच्या तक्रारीवरुन त्यांच्यात सातत्याने भांडणेही होत.

घटनेच्यावेळी रात्री ही पत्नी आसमाने पतीला मुलांच्यात होत असलेल्या भांडणांविषयी सांगितले. त्याचवेळी जेवण करत असलेल्या पतीनं मला शांततेने जेवण तरी करून देता का? असे म्हटले यावरून दोघांच्यात पुन्हा वाद झाला. याचवेळी चिडलेल्या पतीने पत्नी आसमाला मारहाण करण्यास सुरुवात केली . लाथाबुक्क्यांनी तिला मारहाण करत तिचे डोके भिंतीवर आपटले.  त्यानंतर रात्री आसमा झोपली, मात्र सकाळ बराच वेळ झाला तरी त्या उठल्या नाहीत. त्यावेळी पती त्यांना उठवायला गेला. परंतु आसमा उठली नाही , तिचे शरीरपूर्णपणे थंड पडले होते. त्यावेळी त्यांच्या मृत्यू झाल्याचे समोर आले . घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेतली.

कात्रज चौकात केला बिल्डरचा खून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत 40 वर्षीय युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. भर दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे शहरात खळबळ निर्माण झाली होती. या घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी युवकांवर तब्बल सहा गोळ्या झाल्या आहेत.

आता सर्वकाही व्यर्थ..! 40 एक्कर मिरची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची काय झाली अवस्था..?

VIDEO : Sameer Wankhede | समीर वानखेडेंची आत्या यांची मलिकांविरोधात तक्रार दाखल

OBC Reservation : ’10 महिन्यांच्या काळात राज्य सरकारनं काहीही केलं नाही, ओबीसी नेतेही जबाबदार’

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.