पुणे शहरात अटक झालेला दहशतवादी इम्रान होता मास्टमाइंड, सीरियात जाण्याच्या तयारीत होता

Pune Crime News : पुणे शहरात दीड वर्षांपासून दहशतवादी राहत होते. यामधील इम्रान खान हा खतरनाक दहशतवादी होता. घातपात घडवण्यात तो माहीर होता. सीरियात पळून जाण्याच्या तयारी तो होता. त्याचे वडील दुबईत असतात.

पुणे शहरात अटक झालेला दहशतवादी इम्रान होता मास्टमाइंड, सीरियात जाण्याच्या तयारीत होता
pune terrorist
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 2:53 PM

पुणे | 20 जुलै 2023 : पुणे शहरात दोन दिवसांपूर्वी मोठी कारवाई झाली. पुणे शहरात दीड वर्षांपासून राहत असलेल्या दोघ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांचा संबंध जयपुरात सीरियल ब्लास्ट प्रकरणात होता. यामुळे फरार असणाऱ्या या दोघांवर राष्ट्रीय तपास संस्थेने पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएने मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्यांचा समावेश केला होता. त्यातील इम्रान खान हा घातपाती कारवाया आखण्यात मोहीर होता. मास्टरमाइंड अन् म्होरक्या म्हणून त्याची ओळख आहे.

काय आहे नेमका आरोप

मार्च २०२२ मध्ये जयपूरमध्ये सीरीयल ब्लॉस्ट घडवण्याचा कट उघड झाला होता. या प्रकरणात मोहंमद युनूस, इम्रान खान आणि फिरोज यांचा संबंध होता. हे तिघे फरार होते. इम्रान खान हा रतलाममध्ये राहत होता. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मध्य प्रदेश सरकारने इम्रानचे घर जमीनदोस्त केले होते.

२०१५ मध्ये आले होते नाव

इम्रान खान यांचे नाव २०१५ मध्येही आले होते. सीरियाला पळून जाण्याच्या तयारीत असल्यामुळे त्याला अटक झाली होती. त्यांच्याकडून आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत केली गेली. या प्रकरणात इम्रानची वर्षभरानंतर तो जमिनावर मुक्त झाला. त्यानंतर तो फरार होता.

हे सुद्धा वाचा

इम्रानचे वडील दुबईत

इम्रान खानचे वडील कुवेतमध्ये आहेत. तर दुसरा आरोपी युनूसचे वडील सौदीत कामाला आहे. इम्रानची आई आजारी असून काही महिन्यांपूर्वी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दीड वर्षापासून तो घरी आला नाही.

काय आहे प्रकरण

३० मार्च २०२२ मध्ये राजस्थानमधील निम्बाहेडा येथे पोलिसांनी एका मोटारीतून स्फोटके नेताना अल्तमस खान शेरानी याला अटक केली. त्याच्यासोबत सैफुद्दी आणि झुबेर यालाही अटक केली. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला. या चौकशीत इम्रान खान, अमीन खान आणि अमीन पटेल या तिघांची नावे समोर आली.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.