थेरगाव क्वीन’ची थेरं पाहून पालक चिंतेत! थेरगाव क्वीनला फॉलो करणारे ते 70 हजार रिकामटेकडे कोण?

Thergaon Queen : सुरुवातीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी आधी थेरगाव क्वीनचं समुपदेशन केलं. मात्र तरिही तिनं उपदव्याप सुरूच ठेवले. अखेरीस वाकड पोलिसांनी ह्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आणि तिला अटकही केली

थेरगाव क्वीन'ची थेरं पाहून पालक चिंतेत! थेरगाव क्वीनला फॉलो करणारे ते 70 हजार रिकामटेकडे कोण?
थेरगाव क्वीन फेम अल्पवयीन तरुणीला अटक
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 10:51 PM

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील एका तरुणीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चिले जातायेत. त्या व्हिडीओमधील तिचा संवाद पालकांच्या चिंतेत भर घालतोय. तर पोलिसांना धक्का देणाराही ठरतोय. त्यामुळेच वाकड पोलिसांनी अल्पवयीन तरुणी असलेल्या थेरगाव क्वीनसह तिच्या मैत्रिणी वर गुन्हा दाखल करत अटक केलीये. वाकड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान करणाऱ्या या थेरगाव क्वीनवर (Thergaon Queen) करण्यात आलेल्या कारवाईमुळे आता विखारी भाषा वापरणाऱ्या तरुणाईला चाप बसणार का, असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित जाला आहे. तळपायाची आग मस्तकात आणणारा संवाद पिंपरी चिंचवडमधील (Pimpari Chinchwad) थेरगाव क्वीन तरुणीचा आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या आक्षेपार्ह संवादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video of Social Media) चिंतेचा विषय बनलेत. शिवीगाळ, भांडणापासून सुरु होणारी थेरगाव क्वीनची जीभ थेट हत्या करण्यापर्यंत पोहोचल्यानं, तिचे व्हिडीओ चर्चेत आले होते.

मुलांच्या सोशल मीडिया वापराकडे लक्ष द्या!

लॉकडाउन मध्ये शिक्षण ऑनलाइन झालं यातच काही मुलांना असे नको ते चाळे सुरू झाले लक्ष द्यावे ही बाब धोक्याची आहे त्यामुळे पालकांनी याकडे लक्ष द्यावे असा मौलिक सल्ला मानसउपचार तज्ञांनी दिलाय. मानसोबपचार तज्ज्ञ असलेल्या डॉ. श्वेताली घोलप यांनी सोशल मीडियाव सुरु असलेल्या मुलांच्या या वागणुकीवरुन चिंता व्यक्त केली आहे. तर मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बारीक लक्ष ठेवण्याची गरजही व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडीओ –

सुरुवातीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी आधी थेरगाव क्वीनचं समुपदेशन केलं. मात्र तरिही तिनं उपदव्याप सुरूच ठेवले. अखेरीस वाकड पोलिसांनी ह्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आणि तिला अटकही केली असल्याचं पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी म्हटलंय.

वेळीच कारवाई गरजेची!

या स्वयंघोषित “थेरगाव क्वीन”चे अवघ्या काही पोस्टमध्ये सत्तर हजार फॉलोअर्स झालेत. यावरून सोशल मीडियावरील रिकामटेकड्यांची तिला पसंती मिळते हे सिद्ध आहे. त्यामुळे ही वृत्ती जागीच ठेचुन काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर असेल. अन्यथा उद्या आणखी स्वयंघोषित राण्यांचा सुळसुळाट पहायला मिळू शकतो. सोशलमीडिया वरचे व्हिडीओ करून चांगल्या प्रकारची प्रसिद्धी ही अनेकांनी मिळवलीय. पण दहशत पसरवण्यासाठी किंवा सवंग लोकप्रियतेसाठी अश्लील व्हिडिओ तयार करत असाल तर मात्र तुमची रवानगी या थेरगाव क्वीन सारखी जेल मध्ये होईल, हे मात्र नक्की!

संबंधित बातम्या :

ज्यानं अ‍ॅसिड हल्ला केला, त्या पतीला सोडवण्यासाठी चक्क पत्नीची याचना! म्हणते ‘सोडा त्याला, नवराच तर आहे’

अकरावीतील विद्यार्थिनीला हॉटेलवर बोलावलं, गुंगीचं औषध पाजून 22 वर्षीय तरुणाकडून बलात्कार

अहो आश्चर्य!! कोट्यवधींच्या मूर्त्या चोरट्यांकडून साभार! विशेष पॅकिंगही केली, Nanded जवळच्या कंदकुर्ती गावातली घटना काय?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.