Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी चिंचवडमध्ये महिलेवर बलात्कार करुन 20 लाखाची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार अर्ज केला. त्यानुसार कृष्ण प्रसाद यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय जोगदंड, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांना सदर अर्जाबाबत चौकशी करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

पिंपरी चिंचवडमध्ये महिलेवर बलात्कार करुन 20 लाखाची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक
भोंदूबाबा विनोद पवार
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 1:38 AM

पिंपरी-चिंचवड : घरावर काळी जादू झाल्याचे सांगत महिलेवर बलात्कार (Rape) करणाऱ्या आणि 20 लाखांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या भोंदू बाबा (Bhondu Baba)ला पोलिसांनी अटक केली आहे. विनोद शंकर पवार असे अटक करण्यात आलेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. पीडित महिलेच्या घरात सतत कटकटी होत होत्या. या कटकटी थांबवण्यासाठी उपाय करण्यासाठी महिला या भोंदू बाबाकडे जात होती. विनोद पवार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध सांगली आणि वाकड येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास रावेत पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत. (In Pimpri Chinchwad, Bhondu Baba was arrested for raping a woman and defrauding her of Rs 20 lakh)

काय आहे प्रकरण ?

पीडित महिलेच्या घरी दररोज कटकटी होत होत्या. महिलेने याबाबत आरोपी भोंदू बाबाला सांगितले. त्यानंतर आरोपीने महिलेला आपण जादूटोणा आणि अघोरी विद्येचे काम करत असून मला आपल्या घरी येऊन पहावे लागेल असे सांगितले. त्यानुसार आरोपीने महिलेच्या घरी जाऊन पाहणी केली आणि महिलेला तिच्या घरावर काळी जादू केलेली असल्यामुळे रोज कटकटी होतात. तसेच 7-8 महिन्यापेक्षा तुमचा पती जगणार नाही असे सांगितले. यासाठी तांत्रिक विधीकरीता 30 हजार रुपये घेऊन अघोरी पूजा केली. त्यानंतर महिलेला काळ्या जादूची भिती दाखवत पतीकडून 20 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. पैसे घेऊन आल्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कारही केला.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात तक्रार दिली

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदर महिलेने पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार अर्ज केला. त्यानुसार कृष्ण प्रसाद यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय जोगदंड, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांना सदर अर्जाबाबत चौकशी करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. अजय जोगदंड यांनी वाकड पोलिस ठाण्यातील महिला अधिकाऱ्यांना बोलावून महिलेची तक्रार घेऊन त्यानुसार देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी विनोद पवार याला काळेवाडी येथून अटक केली. याप्रकरणी पोलिस पुढील कारवाई करीत आहेत. (In Pimpri Chinchwad, Bhondu Baba was arrested for raping a woman and defrauding her of Rs 20 lakh)

इतर बातम्या

Supreme Court : औषध कंपन्या-डॉक्टरांच्या संगनमताने बेकायदेशीर मार्केटिंग; सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

Rashmi Shukla : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, 1 एप्रिलपर्यंत कारवाई टळली

हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.