Pune Crime : भयंकर ! पुण्यात सेक्सची ऑफर देऊन तरुणाला बोलावले, मग डांबून ठेवत पैसे लुटले

खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मध्यवस्तीत दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. फिर्यादी तरुणाचा काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर आरोपींनी त्याच्या मोबाईलवरून ऑनलाईन 55 हजार 679 रुपये देखील ट्रान्सफर करून घेतले.

Pune Crime : भयंकर ! पुण्यात सेक्सची ऑफर देऊन तरुणाला बोलावले, मग डांबून ठेवत पैसे लुटले
पुण्यात सेक्सची ऑफर देऊन तरुणाला बोलावले, मग डांबून ठेवत पैसे लुटलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 5:00 PM

पुणे : पुण्यातील खडक पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील एका महाविद्यालयात एमबीए करणाऱ्या एका तरुणा (Youth)ला पुण्यात चौघांनी सेक्सची ऑफर देत बोलावून घेतले. त्यानंतर त्याला रात्रभर डांबून ठेवलं आणि त्याच्या जवळचे सर्व पैसे (Money) काढून घेतले. त्यानंतर त्याला तो गे असल्याचे सर्वत्र व्हायरल करेन अशी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक (Arrest) केली आहे. साहिल कुरेशी, अनिकेत जाधव, सुदामा चौधरी, रोहित चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी पीडित तरुणाचे 55 हजार 679 रुपये लुटले

याप्रकरणी 24 वर्षीय तरुणाने या प्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मध्यवस्तीत दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. फिर्यादी तरुणाचा काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर आरोपींनी त्याच्या मोबाईलवरून ऑनलाईन 55 हजार 679 रुपये देखील ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर रात्रभर त्याला खोलीतच डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला सोडून दिले. त्यानंतर या तरुणाने पोलीसांकडे धाव घेतली. त्यानूसार पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीमधील साहिल कुरेशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. (In Pune the young man was offered sex and then robbed of his money)

हे सुद्धा वाचा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.